अमरीश पुरीने अजरामर केली मोगेम्बो ची भूमिका, परंतु या भुमिकेसाठी या अभिनेत्याची करण्यात आली होती निवड !

By Viraltm Team

Published on:

१९८७ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट मिस्टर इंडिया तर सर्वांनी नक्कीच पाहिला असेल. आजहि या चित्रपटाचे असंख्य चाहते आहेत. लोक आजही हा चित्रपट आवडीने पाहतात. या चित्रपटामध्ये अनिल कपूरच्या भुमिकेसोबत आणखी एक भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती आणि ती भूमिका होती मोगेम्बो ची. या चित्रपटामध्ये अमरीश पुरीने आपल्या दमदार अभिनयाने, मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आणि आवाजाने लहान मुलांना खूपच घाबरवले होते. अमरीश पुरीने आपल्या अभिनयाने हि भूमिका अजरामर केली. त्यांचा एक डायलॉग “मोगेम्बो खुश हुआ” आजसुद्धा लोकं बोलताना ऐकायला मिळते. आजही कोणत्या ना कोणत्या चित्रपटामध्ये हा डायलॉग म्हंटलेला आपण पाहत असतो.या भूमिकेमध्ये अमरीश पुरीचा अभिनय इतका दमदार होता कि त्यांच्या या भूमिकेमध्ये कोणत्याही इतर अभिनेत्याला पाहणे अशक्य वाटते. परंतु तुम्हाला माहिती आहे का कि डायरेक्टर शेखर कपूरची या भुमिकेसाठी पहिली पसंती अमरीश पुरी नव्हते तर दुसरेच कोणीतरी होते.

वास्तविक चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मोगेम्बोच्या भूमिकेसाठी अभिनेता अनुपम खेरला घ्यायचे होते. शेखर कपूर आणि चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांची पहिली पसंती अनुपम खेर हे होते आणि त्यांना चित्रपटामध्ये कास्टदेखील केले होते. या गोष्टीचा खुलासा खुद्द अनुपम खेर यांनी दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान केला होता.
अनुपम खेरने म्हंटले होते कि त्यांना मिस्टर इंडियामध्ये मोगेम्बोच्या भूमिकेसाठी कास्ट केले गेले होते, परंतु काही महिन्यानंतर त्यांच्या जागी अमरीश पुरी यांना साईन करण्यात आले. बातमीनुसार, अनिल कपूरनेच अमरीश पुरीची या भुमिकेसाठी निवड करण्याचा आग्रह धरला होता. असे म्हंटले जाते कि त्यांच्या शिफारशीनुसार अमरीश पुरीला शेखर कपूरने साईन केले होते.

अमरीश पुरीने या रोलमध्ये जे काम केले होते, त्यासाठी त्यांचे आजही स्मरण केले जाते. त्यांनी अनेक भाषांच्या चित्रपटामध्ये काम केले, इतकेच नाही तर त्यांनी हॉलीवुडच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे, त्यांना आजही सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जाते.

Leave a Comment