९० दशकामध्ये “आशिकी” या चित्रपटामधून अभिनेत्री अनु अग्रवाल रातो-रात फेमस झाली होती. ११ जानेवारी १९६९ ला दिल्लीमध्ये जन्मलेली अनु अग्रवाल त्याकाळी दिल्ली यूनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेत होती. जेव्हा तिला महेश भट्टने आपल्या रोमँटिक आशिकी चित्रपटामध्ये पहिला ब्रेक दिला होता. नुकतेच ११ जानेवारी रोजी अनु अग्रवालने आपला ५१ वा वाढदिवस साजरा केला आहे.

अभिनेत्री अनु अग्रवालला महेश भट्टची खोज मानले जाते. महेश भट्टनेच आपल्या आशिकी या चित्रपटामधून अनुला लाँच केले होते. या चित्रपटानंतर अनु अग्रवाल टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये गणली जाऊ लागली. आज अनु बॉलीवूडपासून दूर एक अज्ञात जीवन जगत आहे. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर अनु अग्रवालने जवळपास ९ वर्षे चित्रपट मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तिला यश मिळाले नाही.१९९९ मध्ये जेव्हा तिचा अपघात झाला होता त्यावेळी तिचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले. हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता कारण या दुर्घटनेमध्ये अनु अग्रवालने केवळ तिची स्मरणशक्तीच गमावली नाही तर ती २९ दिवस कोमामध्ये होती.अनुच्या स्मरणशक्तीवरदेखील याचा खूप वाईट परिणाम झाला होता. जेव्हा अनु या अपघातातून सावरू लागली त्यावेळी तिने या परिस्थितीशी लढा देण्याचा निश्चय केला आणि तिने विचार केला कि आपल्यासोबत झालेली हि दुर्घटना जगासमोर आणायची आणि हि सर्व हकीकत जगाच्या समोर आणण्यासाठी तिने आपली आत्मकथा लिहिली. बऱ्याच वर्षांपासून कोणाल काहीच माहिती नव्हते कि ती कुठे राहते आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आहे. पण एके दिवशी समजले कि अनु स्‍टारडम आणि फिल्मी दुनियेपासून दूर बिहारमधील एका मुंगेर गावामध्ये आपले आयुष्य व्यतीत करत आहे. ती या गावामधील एका शाळेमध्ये मुलांना योगा शिकवत आहे.अनुच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या प्रसंगी महेश भट्टने अनुची प्रशंसा करताना म्हंटले होते कि, हि मुलगी मृत्युच्या दाढेतून बाहेर आली आहे. पण माझ्यासाठी धक्कादायक बाब हि आहे कि, कशाप्रकारे अशा कठीण प्रसंगातून तिने आपल्या आयुष्याला एक वेगळे वळण दिले. २०१७ मध्ये अनु अग्रवाल पुन्हा चर्चेमध्ये आली जेव्हा ती बेगम जान या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला आली होती. या निमित्ताने अनेक नामांकित कलाकर तिथे पोहोचले होते, पण अनु अग्रवालने सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले. अनु अग्रवालचा लुक पूर्णपणे बदलला आहे आणि आता ती एक साधे आणि सरळ आयुष्य जगत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.