लग्नाच्या वेळी ३ महिन्यांची प्रेग्नंट होती नेहा धुपिया, आईवडिलांना घाबरत मागणी घालण्यासाठी गेला होता अंगद बेदी !

By Viraltm Team

Published on:

प्रसिद्ध अभिनेत्री नेहा धुपिया सध्या खूपच चर्चेमध्ये असल्याची पाहायला मिळत आहे. नेहा धुपियाने अंगद बेदीसोबत लग्न केले आहे. काही दिवसांपूर्वी अंगद बेदीने याचा खुलासा केला कि लग्नाच्या अगोदर नेहा धुपिया प्रेग्नंट झाली होती. या कारणामुळे दोघांनी घाईघाईने लग्न केले होते. अंगद बेदी आणि नेहा धुपियाचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. हे लग्न खूपच साध्या पद्धतीने करण्यात आले होते. या दोघांच्या लग्नाची बातमी सर्वांच्यासाठी हैराण करणारी होती.अंगद बेदीने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे कि तो नेहाच्या आईवडिलांकडे तिचा हात मागण्यासाठी कसा गेला होता आणि तिच्या आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती. मुलाखतीदरम्यान जेव्हा नेहा ने पती अंगदसोबतच्या लग्नाबद्दल बोलण्यास सुरवात केली तेव्हा अंगद बेदीने सांगितले कि नेहा हि बातमी सांगणार नव्हती. यामुळे मला त्यांना सांगायचे होते कि आम्हाला लग्न करण्याची खूप गरज आहे आणि आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो.
अंगद बेदी पुढे म्हणाल कि मी खूपच घाबरलो होतो कारण माझ्यासाठी तो एक निर्णायक दिवस होता. नेहाच्या आईवडिलांशी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा माझे हात थंड पडले होते. अंगद बेदी पुढे म्हणाला कि मला त्यांना सर्वकाही सांगायचे होते कारण नेहा यावर काहीच बोलणार नव्हती. मला फक्त हि गोष्ट त्यांना सांगायची होती आणि त्यांची प्रतिक्रिया पहायची होती.
अंगद बेदी पुढे सांगताना म्हणाला कि, जेव्हा नेहाच्या आईवडिलांना याबद्दल सर्वकाही माहिती झाले तेव्हा ते खूपच हैराण झाले होते. नेहाच्या आईच्या नाकातून तर रक्त येऊ लागले होते. जेव्हा नेहा आणि अंगद बेदीचे लग्न झाले होते तेव्हा नेहा त्यावेळी ३ महिन्यांची प्रेग्नंट होती. तथापि तिने प्रेग्नंसीच्या बाबतीत कोणशीही बातचीत केली नव्हती. सध्या नेहा आणि अंगद यांना एक मुलगी आहे आणि हे दोघे आता एक खुशहाल आयुष्य व्यतीत करत आहेत.

Leave a Comment