वडिलांच्या एका अटीमुळे अमिताभ बच्चन यांना जया बच्चनसोबत करावे लागले होते लग्न !

By Viraltm Team

Published on:

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची जोडी बॉलीवूडमधील सफल जोडींपैकी एक आहे. पण यांची लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. अमिताभ यांनी जया बच्चन यांना एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर पाहिले होते आणि त्याचवेळी ते त्यांच्यावर खूपच इंप्रेस झाले. हि गोष्ट स्वतः अमिताभ बच्चन यानी सांगितली आहे.

दरम्यान निर्माता-दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी हे अमिताभ यांच्याकडे गुड्डी या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन आले होते ज्यामध्ये अमिताभ आणि जया बच्चन यांना कास्ट केले गेले होते. त्या दिवसांमध्ये अमिताभ खूप संघर्ष करत होते. तर जया बच्चन ह्या खूपच प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. ह्या दोघांनी गुड्डी या चित्रपटानंतर एक नजर में या चित्रपटादेखील एकत्र काम केले आणि तेव्हाच यांची लव्ह स्टोरी सुरु झाली.जया बच्चन यांना अमिताभ बच्चन हे मनातल्या मनात आवडू लागले होते आणि अमिताभ सुद्धा त्यांना पसंत करू लागले होते. परंतु दोघांनीही एकमेकांसमोर ते उघड केले नव्हते. जंजीर या चित्रपटाच्या यशानंतर प्रकाश मेहरा सर्व कलाकारांना परदेश दौऱ्यावर घेऊन जाणार होते. परंतु अमिताभ आणि जया हे एकत्र जाऊ इच्छित नव्हते. जेव्हा हि गोष्ट अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय यांना समजली त्यावेळी त्यांनी एक अट घातली.
त्यांनी अशी अट घातली होती कि अमिताभ आणि जया यांना विदेशी एकत्र जायचे असेल तर त्यांनी आधी एकमेकांशी लग्न करावे लागेल तर ते प्रदेशात एकत्र जाऊ शकतील. या कारणास्तव दोघांनाही लग्न करावे लागले. दोघांनी एका मंदिरामध्ये गुपुचूप लग्न केले होते आणि नंतर ते परदेशी गेले. तथापि या काळामध्ये त्यांच्या नात्यामध्ये अनेक चढ-उतार आले. तरीही आज ते दोघेही खूप आनंदी जीवन व्यतीत करत आहेत.

Leave a Comment