२२ वर्षापूर्वी अमिताभ सोबत या चित्रपटामध्ये दिसणार होता आमिर, सून ऐश्वर्या रायची देखील झाली होती भेट !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवुडचा पर्फेक्टनिस्ट आमिर खान आणि चित्रपट जगताचे महानायक अमिताभ बच्चन ठग्स ऑफ हिंदोस्तान चित्रपटापूर्वी एकाही चित्रपटामध्ये एकत्र दिसले नाहीत. पण या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ १९९७ मधला आहे. या व्हिडीओमध्ये आमिर आणि अमिताभ यांच्या पहिल्या चित्रपटाची प्रेस कॉन्फरंस आहे. हा तो काळ होता जेव्हा आमिर खान नवा नवा स्टार बनला होता आणि अमिताभ बच्चन आपले करियर वाचवण्यासाठी स्ट्रगल करत होते. अमिताभ जवळ जवळ २२ वर्षापूर्वी एका चित्रपटात आमिर सोबत एकत्र काम करणार होते.निर्देशक इंद्र कुमारने एका चित्रपटाची स्क्रिप्ट तयार केली आणि या चित्रपटासाठी त्यांनी अॅक्टर देखील फाईनल केले. हे अॅक्टर अमिताभ बच्चन, आमिर खान आणि माधुरी दीक्षित होते. इतक्या तगड्या स्टारकास्टसोबत जर चित्रपट बनला असता तर सुपरहिट झाला असता. या चित्रपटाचे नाव अजून फाईनल केले गेले नव्हते अशामध्ये लोकांनी असेच या चित्रपटाला रिश्ता म्हणून नाव दिले. चित्रपटाचे डायरेक्शन इंद्र कुमारच्या हातात होते.इंद्र कुमार सांगतात की ज्यावेळी या चित्रपटाचा मुहूर्त झाला. त्या वेळेस ते इश्क चित्रपटाची शुटींग करत होते. ते अगोदरच आमिरसोबत एका चित्रपटामध्ये व्यस्त होते. त्याला असे वाटले की एकदाच २ चित्रपट आणि ते पण एक रिश्ता सारखा मोठा चित्रपट ते साभाळू शकणार नाही. यामुळे त्यांनी हा चित्रपट काही दिवसासाठी बनवणे बंद केले.त्यांची दुसरी एक चिंता होती की ते अमिताभच्या भूमिकेला न्याय देऊ शकत नव्हते. ही गोष्ट त्यांनी अमिताभ बच्चनला सांगितली. जुन्या व्हिडीओच्या प्रेस कॉन्फरंसमध्ये जया बच्चन, ऐश्वर्या रायला देखील पाहू शकता. त्यावेळी ऐश्वर्या और प्यार हो गया चित्रपटाची शुटींग करत होती. हा तोच काळ होता जेव्हा ऐश्वर्या आणि सलमान खानच्या अफेयरच्या चर्चा मोठ्या प्रमाणात होत्या. या व्हिडीओत ऐश्वर्या अमिताभ सोबत हसताना आपण पाहू शकता. त्यावेळी कोणाला माहित होते की ऐश्वर्या पुढे चालून बच्चन कुटुंबाची सून होईल.

Leave a Comment