तान्हाजी चित्रपट पाहिल्यानंतर जाणून घ्या बॉलीवूड स्टार्स शाहरूख, अक्षय पासून ते आमिर खानची प्रतिक्रिया !

By Viraltm Team

Published on:

अजय देवगनचा चित्रपट तान्हाजी १० जानेवारी रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला खूपच पसंती दिली आहे आणि या चित्रपटाला चांगली रेटिंगसुद्धा दिली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलीवूड स्टार्सनी कशी प्रतिक्रिया दिल्या आहेत चला जाणून घेऊयात.

तान्हाजी चित्रपट पाहिल्यानंतर फेमस क्रिटिक एक्सपर्ट तरन आदर्शने हा चित्रपट खूपच जबरदस्त आहे असे सांगितले आहे आणि त्याने या चित्रपटाला ५ पैकी ४ स्टार दिले आहेत. सोहेल खान ने या चित्रपटाला ५ पैकी ४ स्टार दिले आहेत. सोहेलने सांगितले कि या चित्रपटाचे छायांकन व दिग्दर्शन खूपच उत्तम केले आहे.अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खान यांनी अजय देवगनची खूपच प्रशंसा केली आहे आणि म्हंटले आहे कि हा चित्रपट खूपच उत्तम आहे आणि असे चित्रपट पुन्हा पुन्हा होत नाहीत. ते म्हणाले कि या चित्रपटातील सर्वच गोष्टी अद्भुत आहेत. मग तो अभिनय असो, चित्रपटाचे संगीत असो किंवा चित्रपटाचे दिग्दर्शन असो. तान्हाजी या चित्रपटाला सर्वांकडूनच खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

हा चित्रपट एकूण ३०० ते ५०० कोटी इतकी कमाई करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ७३ कोटी इतकी कमाई केली असून अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Leave a Comment