‘मैन वर्सेज वाइल्ड’ च्या शुटींगचे फोटो झाले लीक, पहा सहा तास जंगलामध्ये कसा राहिला अक्षय कुमार !

By Viraltm Team

Published on:

रजनीकांतनंतर आता अक्षय कुमार मॅन वर्सेस वाईल्ड शोमध्ये पाहायला मिळणार आहे अक्षयने शोचा होस्ट बेयर ग्रिल्ससोबत शुटींग पूर्ण केले आहे. शुटींगदरम्यानचे बेयर ग्रिल्ससोबतचे काही फोटो सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

रजनीकांतसारखे अक्षयने सुद्धा शो चे शुटींग कर्नाटकच्या बांदीपूर टाईगर रिजर्व अँड नॅशनल पार्क येथे केले आहे. या फोटोंमध्ये अक्षय कुमार मॅन वर्सेस वाईल्ड चा होस्ट बेयर ग्रिल्स सोबत दिसत आहे. अक्षय कारमध्ये बसला आहे तर बेयर बाहेर उभे राहून त्याच्या हातामध्ये हात देत आहे.शोचे शुटींग सहा तास चालू होते. या फोटोमध्ये अक्षय गाडीच्या आतमध्ये बसला आहे. तर दुसरीकडे अक्षय लोकांच्या सोबत दिसत आहे. या फोटोमध्ये अक्षयने खाकी रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची ट्राउजर परिधान केली आहे. आता जरा या फोटोमध्ये पहा. या फोटोमध्ये अक्षय कुमार मॅन वर्सेस वाईल्डच्या टीम सोबत पाहायला मिळत आहे. अक्षयने या शोचे शुटींग रजनीकांतचे शुटींग पूर्ण झाल्यानंतर केले आहे. शुटींग दरम्यान रजनीकांतला किरकोळ दुखापत देखील झाली होती. रजनीकांतच्या दुखापतीबद्दल एका वन अधिकाऱ्याने सांगितले कि, रजनीकांत आपला टोल सांभाळू शकले नाहीत आणि त्यांचा पाय मुडपला. यामुळे त्यांच्या हाताला आणि कोपराला किरकोळ दुखापत झाली.अक्षय कुमार आणि रजनीकांतच्या अगोदर पीएम मोदीसुद्धा या शोचा हिस्सा राहिले आहेत. पीएम मोदींच्या या एपिसोडला डिस्कवरी नेटवर्कच्या वाहिन्यांवर १८० पेक्षा जास्त देशामध्ये दाखवले गेले होते. त्या एपिसोड दरम्यान पीएम मोदींनी पशु संरक्षण आणि पर्यावरण परिवर्तन संबंधित अनेक गोष्टी जगासमोर मांडल्या. पीएम मोदी आणि ग्रिल्सचा हा शो उत्तराखंडच्या जिम कॉर्बेटच्या जंगलामध्ये शूट करण्यात आला होता.

Leave a Comment