आरआरआर साठी अजय देवगनने फीस घेण्यास दिला नकार, समोर आले हे खरे कारण !

By Viraltm Team

Published on:

अ‍ॅक्टर अजय देवगन लवकरच चित्रपट निर्माते एस.एस. राजामौलीच्या आरआरआर या चित्रपटामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बातमीनुसार अजय देवगनने या चित्रपटासाठी फीस घेण्यास नकार दिला आहे. तथापि चित्रपटाचे प्रोड्यूसर डीवीवी धन्याने अजय देवगनला संपूर्ण फीस ऑफर केली होती, परंतु ती घेण्यास अजय देवगनने नकार दिला आहे. असे सांगितले जात आहे कि. अजय आणि राजामौली एक चांगले मित्र आहे. अजय आणि राजामौलीची मैत्री त्यावेळीपासून आहे ज्यावेळी या दोघांनी ईगा वर काम केले होते.प्रदर्शनाची तारीख बदलली :- अंजय देवगनने सरळ शब्दात सांगितले आहे कि तो फक्त मैत्रीसाठी या चित्रपटामध्ये काम करत आहे. चित्रपटामध्ये राम चरण आणि जूनियर एनटीआर मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसणार आहेत. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली आहे. आता हा चित्रपट २०२० मध्ये नाही तर ८ जानेवारी २०२१ मध्ये थियेटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

१० भाषांमध्ये होणार प्रदर्शित :- आरआरआर चित्रपट जगभरामध्ये एकाच वेळी दहा भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटामध्ये अजय देवगनशिवाय आलिया भट्ट सुद्धा महत्वाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटामध्ये अंतर्राष्ट्रीय अभिनेता रे स्टीवेन्सन, एलिसन डूडी आणि ओलिविया मॉरिस सुद्धा दिसणार आहेत. हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आधारित असून खऱ्या घटनेने प्रेरित राजामौलीचा हा पहिलाच चित्रपट आहे.

Leave a Comment