आई त’वा’य’फ आणि वडील पंजाबी बिजनेसमन, असा झाला होता या अभिनेत्रीचा जन्म नाव जाणून आश्चर्यचकित व्हाल !

By Viraltm Team

Updated on:

जर बॉलीवूड जगताबद्दल बोलायचे झाले तर या जगतामध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची स्टाईल आणि लुक किंवा त्यांचा अंदाज लोकांना खूपच आवडतो. काही लोक तर अगदी त्यांच्यासारखाच हुबेहूब लुक करून घेतात. आज आपण एका अशा अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जी सध्या आपल्यामध्ये नाहीय तरीसुद्ध लोकांना आजही तिचा अंदाज खूपच आवडतो.

तुमच्या माहितीसाठी सांगतो कि ज्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत तिचे नाव आहे नर्गिस. होय, नर्गिस एकेकाळची अशी अभिनेत्री होती जिचे पोस्टर्स आजही लोकांच्या घराच्या भिंतीवर लावलेले दिसून येतात. तिचा अंदाज आणि अभिनयच इतका दमदार होता कि कोणीही तिचा पाहताक्षणीच चाहता व्हायचा. नर्गिस दिसायला जितकी सुंदर होती तितकीच ती निरागस होती.

तसे तर आपण सर्व नर्गिसच्या आयुष्याबद्दल सर्व काही जाणतोच पण आज आम्ही तुम्हाला नर्गिसच्या आयुष्याशी संबंधित एक असा किस्सा सांगणार आहोत ज्याच्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. तसे पाहायला गेले तर हा खूपच जुना किस्सा आहे. जेव्हा एक श्रीमंत घरातील मुलगा ज्याचे नाव होते मोहन, डॉक्टर बनण्यासाठी कोलकाता येथून जहाजातून लंडनला जात होता. जहाज येण्यासाठी बराच वेळ होता म्हणून तो मुलगा कोलकाता शहर फिरण्यासाठी निघाला.

शहरामध्ये फिरता फिरता योगायोगाने तो जड्न बाई नावाने प्रसिद्ध असणाऱ्या त’वा’य’फ’च्या कोठ्यावर जाऊन पोहोचला. जड्न बाईचे गाणे ऐकल्यानंतर तो तिच्यावर इतका मोहित झाला कि तो तिच्यावर मनापासून प्रेम करू लागला. त्यानंतर जड्न बाईने मोहनला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्याने जड्न बाईसोबत लग्न करण्याचा विचार केला होता.

तसे तुम्ही विचार करत असाल कि या सर्व गोष्टीमध्ये नर्गिसने नाव कुठेहि येत नाही. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कि जड्न बाई आणि मोहनच्या लग्नानंतर जी मुलगी जन्माला आली ती दुसरी तिसरी कोणीही नव्हती तर नर्गिस होती. म्हणजेच जर आपण सरळ भाषेत बोलायचे झाले तर नर्गिस दत्त या दोघांच्या प्रेमाची निशाणी होती.
तसे तर अभिनेत्री बनण्यापूर्वी नर्गिसला आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बनायचे होते. परंतु आपल्या आईच्या बुडणाऱ्या फिल्म कंपनीला वाचवण्यासाठी तिने अभिनय करण्यास सुरवात केली. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर लोकांवर तिची जादू कश्याप्रकारे झाली होती हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही.

याशिवाय असेदेखील म्हंटले जाते कि, राज कपूर नर्गिसवर अतोनात प्रेम करत होते. इतकेच नव्हे तर नर्गिस त्यांच्या चित्रपटाची अविभाज्य भाग होती. त्यामुळेच तर आर. के. फिल्म्सचे प्रतिक चिन्ह राज कपूर आणि नर्गिस यांच्या एका चित्रपटातील दृश्य बनवले होते. तसे तर नर्गिससुद्धा राज कपूरवर प्रेम करत होती. परंतु ते विवाहित होते आणि त्यांची दोन मुले होती.

ज्यामुळे नर्गिस दत्त ने आपले हे नाते फार पुढे जाऊ दिले नाही आणि तिने सुनील दत्तसोबत लग्न केले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि ज्या दिवशी नर्गिसचे नि’ध’न झाले होते त्याच दिवशी राज कपूरनेही या जगाचा निरोप घेतला होता. नर्गिसचे नि’ध’न ३ में १९८१ ला झाले होते तर त्यानंतर बरोबर सात वर्षांनंतर ३ में रोजी राज कपूर यांचे नि’ध’न झाले होते. कदाचित याला योगायोगच म्हणावा लागेल.

Leave a Comment