टीव्ही जगतामध्ये जेव्हा देखील श्रीकृष्णाचे नाव येते तेव्हा सर्वात पहिला प्रसिद्ध अभिनेत्री नितीश भारद्वाजचा चेहरा रामोर येतो. नितीश भारद्वाजने श्रीकृष्णाची भूमिका करून आपल्यासाठी त्यांना पुन्हा जिवंत केले होते. इतकेच नाही तर बी आर चोपड़ाच्या महाभारतमध्ये देखील श्रीकृष्णाची भूमिका नितीश भारद्वाज यांनीच केली होती. तथापि नितीश भारद्वाजशिवाय अनेक अभिनेते असे आहेत ज्यांनी श्रीकृष्णाची भूमिका करून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
नितीश भारद्वाज: नितीश भारद्वाजने बी आर चोपड़ाच्या महाभारत सिरीयलमध्ये श्रीकृष्णाची भूमिका केली होती. ज्यामध्ये त्यांना खूपच पसंद केले होते. इतकेच नाही तर नितीश भारद्वाजला या भूमिकेमधून इतकी सफलता मिळाली होती कि लोक त्यांना अक्षरशः श्रीकृष्ण म्हणून पुजू लागले होते. नितीश भारद्वाजने आपल्या करियरमध्ये टीव्ही सिरीयलसोबत अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले.
स्वप्निल जोशी: स्वप्निल जोशीने रामानंद सागरच्या कृष्णा सिरीयलमध्ये श्रीकृष्णाची भूमिका केली होती. सिरीयलमधून स्वप्निल जोशीला खूपच प्रसिद्धी मिळाली. स्वप्निल जोशीने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अजून देखील तो मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे.
सर्वदमन डी बनर्जी: तरुणपणी जिथे स्वप्निल जोशीने श्रीकृष्णाची भूमिका केली होती तर यानंतर कृष्णा सिरीयलमध्ये अभिनेता सर्वदमन डी बनर्जीने श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. याशिवाय सर्वदमन डी बनर्जीने आपल्या करियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सुशांत सिंह राजपूतच्या एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी चित्रपटामध्ये ते शेवटचे पाहायला मिळाले होते.
मृणाल जैन: प्रसिद्ध अभिनेता मृणाल जैनने कहानी हमारे महाभारत की सिरीयलमध्ये श्रीकृष्णाची भूमिका केली होती. हि सिरीयल २००८ मध्ये सुरु झाली होती. तथापि हि सिरीयल दर्शकांना खास पसंद आली नाही. मृणालने आपल्या करियरमध्ये दिल ही तो है, बंधन, उतरन सारख्या टीव्ही सिरीयलमध्ये काम केले आहे.
मेघन जाधव: प्यार तूने क्या किया, सास बिना ससुराल, राधा कृष्ण, सूर्यपुत्र कर्ण सारख्या टीव्ही सिरियल्समध्ये काम केले आहे. अभिनेता मेघन जाधवने २००९ मध्ये आलेल्या जय श्री कृष्णा टीव्ही सिरीयलमध्ये श्रीकृष्णाची भूमिका केली होती. या सिरीयलमध्ये मेघनला खूपच पसंद केले होते.
विशाल करवाल: द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण सिरीयल २०१२ मध्ये आली होती. या सिरीयलमध्ये विशाल करवालने श्रीकृष्णाची भूमिका केली होती. ज्यामध्ये त्यांना खूपच पसंद केले होते. विशालने आपल्या करियरमध्ये जमाई राजा, नागार्जुन एक योद्धा, रंगरसिया सारख्या टीव्ही सिरियल्समध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी बिग बॉस ६ मध्ये देखील भाग घेतला होता.
सौरभ पांडे: अभिनेता सौरभ पांडेने सूर्यपुत्र कर्णमध्ये श्रीकृष्णाची भूमिका केली होती. सौरभ पांडेला देखील श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये खूप पसंद केले होते. सिरीयलमध्ये काम केल्यानंतर ते मनोरंजन जगतापासून दूर गेले. माहितीनुसार सौरभ पांडे सध्या आपले वैवाहिक लाईफ एन्जॉय करत आहेत.
सुमेध मुद्गलकर: सुमेध मुद्गलकर २०१८ मध्ये आलेल्या राधा कृष्ण सिरीयलमध्ये श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये दिसले होते. ज्यामध्ये दर्शकांनी त्यांना खूप पसंद केले होते. याशिवाय त्यांना जय कन्हैया लाल की टीव्ही सिरीयलमध्ये विष्णूदेवाची भूमिका करण्याची देखील संधी मिळाली होती. आपल्या दोन्हीहि भूमिका त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे साकारल्या.
सौरभ राज जैन: सौरभ राज जैन छोट्या पडद्यावरील मोठे नाव आहे. सिद्धार्थ कुमारने महाभारत सीरियलमध्ये श्रीकृष्णाची भूमिका केली होती. ज्यामुळे त्यांना खूप सफलता मिळाली. इतकेच नाही तर सौरभ राज जैनच्या आवाजाने प्रत्येकाला मंत्रमुग्ध केले. या सिरीयलच्या माध्यमातून सौरभ जैन यांना खूप पसंद केले गेले होते.