बॉलीवूडमध्ये दररोज नवीन चित्रपट रिलीज होत असतात. या चित्रपटामध्ये अनके अॅक्शन चित्रपटसुद्धा असतात. या चित्रपटामध्ये नेहमी आपण आपल्या फेवरेट कलाकारांना अॅक्शन सीन करताना पाहत असतो. मोठ-मोठ्या इमारतींवरून उडी मारताना आपण त्या हीरोचे खूप कौतुक करत असतो, परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो कि हे सर्व अॅक्शन सीन तुमचे फेवरेट अॅक्टर नाही तर स्टंटमॅन करत असतात. ज्यांचा लुक आणि कपडे अगदी हिरोसारखे केले जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फेमस अॅक्टरच्या डमी बद्दल सांगणार आहोत.
सलमान खान :- सलमान खानला नेहमी आपल्या चित्रपटामध्ये खतरनाक स्टंट करताना आपण पाहत असतो. त्याच्या सुल्तान, एक था टाइगर, टाइगर जिन्दा है या चित्रपटांमध्ये त्याने जे काही स्टंट केले होते ते सर्व स्टंट त्याचा डमी परवेजने केले होते.ऋतिक रोशन :- हृतिकच्या लूक आणि त्याच्या स्टाईलचे बरेच लोक फैन आहेत. तसे तर हृतिकला बहुतेकदा चित्रपटामधील अॅक्शन सीन्स स्वतःच करायला आवडतात. पण त्याच्या बँग बँग आणि मोहेंजोदारो या चित्रपटांमध्ये त्याला डमीची गरज पडली होती. हृतिकच्या डमीचे नाव आमिर खान असे आहे.शाहरुख़ खान :- शाहरुख़ खान तसे तर जास्त करून रोमँटिक चित्रपटांसाठीच जास्त ओळखला जातो परंतु कधीकधी त्याला काही चित्रपटांमध्ये स्टंटसाठी डमीची आवश्यकता पडते. चेन्नई एक्सप्रेस आणि फॅन चित्रपटामध्ये त्याचे अनेक अॅक्शन सीन त्याच्या डमीने केलेले आहेत.अक्षय कुमार :- बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपले अॅक्शन सीन स्वतः करण्यासाठी आणि फिटनेस साठी जास्त ओळखला जातो. परंतु काहीवेळा सुरक्षेच्या कारणास्तव त्याला स्टंट करू दिले जात नाहीत. फिल्म चांदनी चौक टू चाइना चित्रपटामध्ये अक्षय कुमारने त्याच्या डमीची मदत घेतली होती.आमिर खान :- बॉलीवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानला त्याच्या कामासाठी आणि अदाकारीसाठी मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखले जाते. त्याच्या धूम ३ या चित्रपटामधील अनेक अॅक्शन सीन्स करण्यासाठी त्याला डमीची आवश्यकता भासली होती.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.