बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आपल्या चित्रपटातील भूमिका साकारण्यासाठी काहीही करण्यास नेहमी तयार असतो. आमिर खानला चित्रपटाचेच नाही तर दिग्दर्शनाची देखील इथंभूत माहिती आहे. त्याने आपले करियर असिस्टंट म्हणूनच सुरु केले होते. पण आपल्याला सांगू इच्छितो कि अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नामध्ये आमिर खानने एक व्हिडियोग्राफर म्हणून काम केले होते. त्यावेळी सुद्धा आमिर खान खूपच पॉपुलर होता.
आमिर खान आणि ट्विंकल खन्ना यांनी मेला चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. यादरम्यान ते एक चांगले मित्र बनले. चित्रपटाच्या शुटींगदरम्यान ट्विंकल खन्नाने आमिर खानला सांगितले होते कि या चित्रपटानंतर मी लग्न करणार आहे. तेव्हा आमिरने आश्वासन दिले होते कि तिच्या लग्नामध्ये तिला सर्वात चांगली भेट देईल. तथापि त्याने हे नव्हते सांगितले कि तो कोणती भेट देणार आहे.ट्विंकल आणि अक्षय कुमार त्यावेळी एकमेकांना डेट करत होते. ट्विंकलने अक्षयसमोर हि अट ठेवली होती कि मेला चित्रपट सुपरहिट झाला तर मी पुढेही चित्रपटामध्ये काम करीन. नाही तर तुझ्यासोबत लग्न करेन. मेला चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो फ्लॉप ठरला. यानंतर अक्षय आणि ट्विंकलने लग्न केले.
ट्विंकल आणि अक्षयच्या लग्नाची सर्व तयारी चालू होती आणि जेव्हा आमिर खान लग्नामध्ये आला त्यावेळी ट्विंकल त्याला पाहून आश्चर्यचकित झाली. ट्विंकलच्या लग्नामध्ये आमिर खान चक्क व्हिडीओ कॅमेरा घेऊन फिरत होता आणि एक व्हिडीओग्राफर म्हणून त्याने संपूर्ण लग्नाचा व्हिडिओ बनविला. आमिर खान आणि ट्विंकल खन्ना एकमेकांचे खूपच चांगले मित्र होते. परंतु अक्षय कुमार आणि आमिर खान यांचे जास्त काही चांगले संबंध नाही राहिले. या दोघांनी कधीही एका चित्रपटामध्ये एकत्र काम केले नाही.