जबरदस्त लुक असलेल्या Realme GT 5 Pro ची किंमत आली समोर, स्पेसिफिकेशंस देखील आहेत दमदार

By Viraltm Team

Updated on:

Realme GT 5 Pro

Realme चा दमदार फ्लॅगशिप Realme GT 5 Pro 7 डिसेंबर रोजी लॉन्च होणार आहे. ब्रँड सतत फोनच्या संदर्भातील नवीन टीझर जरी करत आहे. Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह हा कंपनीचा पहिला मोबाइल असणार आहे. डीटेल्समध्ये 50W वायरलेस चार्जिंग, IMX 890 सेन्सर, पेरिस्कोप लेन्स सारख्या अनेक शक्तिशाली स्पेसिफिकेशनची पुष्टी केली गेली आहे. शिवाय, डिव्हाइसच्या नवीन इमेजने याच्या सुंदर लुक आणि लीक झालेली किंमत देखील समोर आली आहे.

Realme gt5 pro किंमत (अपेक्षित)

Realme GT 5 Pro

चीनी ई-कॉमर्स पोर्टल Tmall वर रियलमी जीटी 5 प्रो फोनच्या किंमतीची घोषणा करण्यात आली आहे. तुम्ही झाली दिलेली इमेज पाहू शकता. चीनमध्ये या डिव्हाइसची किंमत CNY 3499 आहे. भारतीय रुपयांमध्ये पाहिल्यास नवीन Realme GT 5 Pro सुमारे 41,800 रुपयांना मिळू शकतो.

रियलमी जीटी 5 प्रो फोटो (लीक)

ब्रँड द्वारे रियलमी जीटी 5 प्रो ची फ्रंट डिझाईन समोर आणल्यानंतर याचा आणखी एक फोटो ऑनलाइन व्हायरल झाला आहे. तुम्ही या इमेजमध्ये पाहू शकता कि मोबिलमध्ये पाठीमागे वक्र कडा आहेत आणि एक मोठा कॅमेरा बंप देखील दिसत आहे. हे डिव्हाईस गोल्ड कलरमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यामध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश आहे. कॅमेरा मॉड्यूल जवळ Realme ची ब्रँडिंग दिली आहे. उजव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे आहेत.

Realme GT 5 Pro चे स्पेसिफिकेशन

Realme GT 5 Pro

डिस्प्ले: Realme GT 5 Pro मध्ये फ्रंट पॅनल डिस्प्ले नवीन नॅरो-एज डिझाईनसोबत येईल. यामध्ये बीओई तंत्रज्ञान उपलब्ध असेल. तथापि, ब्रँडने अद्याप रिझोल्यूशन आणि इतर आकाराचे तपशील उघड केलेले नाहीत.

कॅमेरा: कॅमेरा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हि पुष्टी झाली आहे कि डिव्हाईसमध्ये 2.7X ऑप्टिकल झूम सपोर्टसह पेरिस्कोप लेन्स असेल. लेन्स सोनी IMX 890 सेन्सरसह येईल. मोबाईलमध्ये 120X डिजिटल झूमची सुविधा देखील असेल.

बॅटरी: Realme GT 5 Pro हा कंपनीचा पहिला वायरलेस चार्जिंग फिचरवाला स्मार्टफोन असेल. ब्रँडने टीझरद्वारे पुष्टी केली आहे की यामध्ये 50W वायरलेस चार्जिंग असेल. फोनमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंगसह 5400mAh बॅटरी असेल.

प्रोसेसर: Realme GT 5 Pro मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेट दिले जाईल. ज्याला दमदार परफॉर्मेंससाठी नुकतेच बाजारामध्ये लॉन्च केले गेले आहे.