जरीन खान आणि डेजी शाह दोघीही बॉलीवूड जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्या बॉलीवूडमध्ये सलमान खानमुळे सुपरस्टार बनल्या आहेत. डेजी शाह आणि जरीन खानला बॉलीवूडमध्ये लॉन्च करणारा सलमान खानचा आहे आणि दोघी स्टार्सने सलमान खानसोबतच मुख्य अभिनेत्री म्हणून फिल्मी जगतामध्ये पाउल ठेवले होते. डेजी शाहने सलमान खानचा जय हो (२०१४) मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली तर जरीन खानने वीर (२०१०) चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती.नुकतेच डेजी शाह आणि जरीन खान शॉपिंगसाठी आल्या होत्या, रस्त्यामध्ये दोघींची भेट झाली आणि दोघी एकमेकींना पाहून भेटल्या आणि डांस देखील करू लागल्या. कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले या दोघींचे फोटो खूप व्हायरल झाले आणि दर्शकांनादेखील खूप आवडले. जरीन खान आणि डेजी शाह अभिनित हेट स्टोरी चित्रपटामुळे देखील या दोघी खूप चर्चेमध्ये राहिल्या होत्या. हा चित्रपट ४ डिसेंबर २०१७ ला रिलीज झाला होता, ज्यामध्ये शरमन जोशी आणि करण सिंह ग्रोवर मुख्य भूमिकेमध्ये होते. जरीन एक मुख्य अभिनेत्री म्हणून पंजाबी चित्रपट जट्ट जेम्स बांड मधून प्रसिद्ध झाली होती. जरीन सोशल मिडीयावरदेखील खूप अॅपक्टिव असते. नेहमी इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसोबत आपले फोटो शेयर करत असते.