या कारणांमुळे पिंडऱ्यां मध्ये होतात वेदना, जाणून घ्या काय आहे याच्या इलाजाचा विकल्प आणि बचाव !

By Viraltm Team

Updated on:

पिंडऱ्या गुडघ्याच्या खाली असतात, ज्या तीन स्नायूंनी (गॅस्ट्रोकनेमियस, सोस आणि प्लांटेरिस) बनलेल्या असतात. पिंडऱ्यांमध्ये वेदनांची समस्या सामान्य असते, पण हे जरुरी नाही कि फक्त खेळाडू किंवा जास्त वय असलेल्या लोकांनाच होते तर हि समस्या कमी वय असणारे आणि जे कोणत्याही खेळामध्ये भाग घेत नाहीत त्यांच्यामध्ये देखील पाहायला मिळते.

पिंडऱ्यांमधील वेदना खूपच त्रासदायक असतात. ज्यामुळे पूर्ण पायामध्ये सूज येते. या स्थितीमध्ये रक्त वाहिन्या आणि ऊतींवर याचा परिणाम होतो. जे पिंडऱ्यांच्या आसपास असत. यामुळे नेहमी शक्य तितक्या लवकर इलाज करण्याची आवश्यकता असते. पण याआधी तुम्हाला हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे कि कोणत्या कारणांमुळे पिंडऱ्यांमध्ये वेदना किंवा सूज येते.

स्नायू अकडणे: जसे कि तुम्हाला याआधीच सांगितले आहे कि पिंडऱ्या तीन स्नायूंनी बनलेल्या असतात. जेव्हा हे स्नायू अकडतात तेव्हा पिंडऱ्यांमध्ये हळू हळू वेदना होऊ लागतात. पिंडऱ्यांमध्ये स्नायू अकडल्यामुळे नेहमी वेदना जाणवू लागतात ज्यामुळे खूपच त्रास होतो. पण हे एकदा किंवा दोनदा झाले तर ती सामान्य बाब आहे पण नेहमी असे होऊ लागल्यास याला कधीच सामान्य समजू नये. जास्त दिवस स्नायू अकडणे किंवा पिंडऱ्यांमध्ये वेदना असल्यास हे खूपच धोकादायक असू शकते.

स्नायूंमध्ये तणाव: शरीराच्या कोणत्याही भागातील स्नायूंमध्ये जेव्हा तणाव होतो तेव्हा यादरम्यान वेदना आणि सूज सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. असेच पिंडऱ्यांमध्ये देखील होते. जेव्हा तुमच्या पिंडऱ्यांमध्ये वेदना होऊ लागते तेव्हा असे तणावामुळे देखील होऊ शकते. सामन्यत: जास्त खेळल्यामुळे, व्यायाम केल्यामुळे किंवा जास्त चालण्यामुळे देखील होऊ शकते. जर हे काही दिवसांमध्ये सामान्य झाले तर ठीक आहे पण नाही झाले तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

प्लांटारिस स्नायूं खराब होणे: पिंडऱ्या ज्या स्नायूंनी बनलेल्या असतात त्यामधील प्लांटारिस एक असते. जेव्हा हे खराब होतात किंवा कमजोर होऊ लागतात तेव्हा यादरम्यान आपल्याला तीव्र वेदना जाणवू लागतात. याचा अंदाज आपल्याला सुरुवातीच्या चरणामध्ये होत नाही कारण यामध्ये आपल्याला हलकी वेदना आणि सूज पाहायला मिळते. जेव्हा तुम्ही डॉक्टरांद्वारे तपासणी करता तेव्हा आपल्याला हे माहिती होते.

रक्त गोठणे: रक्ताच्या गाठी शरीराच्या कोणत्याही भागामध्ये होऊ शकतात ज्या आपल्याला एका गाठीच्या रुपामध्ये पाहायला मिळतात. यामध्ये आपल्याला वेदना आणि प्रभावित भागावर सूज पाहायला मिळते. अशामध्ये पिंडऱ्यांच्या नसांमध्ये रक्ताच्या गाठी बनल्याने तीव्र वेदना जाणवू लागतात. रक्ताच्या गाठींची समस्या वाढत्या वयाच्या लोकांना, गर्भावस्थे दरम्यान, जास्त वजन असणाऱ्या किंवा लठ्ठपणा असलेले लोक, कँसरपिडीत लोक आणि धुम्रपान करणाऱ्या लोकांना जास्त होते.

पण यामध्ये हे समजून घेण्याची बाब आहे कि जेव्हा आपले डॉक्टर आपल्याला हे सांगतात कि आपल्या पिंडऱ्यांमध्ये होत असलेल्या वेदना रक्तांच्या गाठीमुळे होत आहेत तेव्हा यादरम्यान कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांशी बातचीत करणे गरजेचे आहे. तुमचे डॉक्टर रक्ताच्या गाठी कमी करण्यासाठी औषधे देऊ शकतात ज्याचे पालन करायचे आहे. रक्ताच्या गाठीच्या स्थितीमध्ये तुमचे डॉक्टर तुम्हाला पूर्ण उपचाराची पद्धत सांगतील ज्याच्या मदतीने तुम्ही स्वस्थ राहू शकता.

उपचार
थंड किंवा गरम शेक: पिंडऱ्यांच्या वेद्नेमध्ये आराम मिळवण्यासाठी डॉक्टर तुम्हाला गरम किंवा थंड पाण्याने शेक देण्याचा विकल्प देऊ शकतात, ज्याच्या मदतीने तुम्ही आपल्या सूज आणि वेदनेमध्ये आराम मिळवू शकता. पण तुम्ही स्वतः विकल्प निवडण्यापेक्षा आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

स्ट्रेचिंग: स्ट्रेचिंग म्हणजे ताणणे हा देखील स्नायूंना आराम देण्यासाठी आणि तणावमुक्त करण्यासाठी एक उत्कृष्ठ विकल्प आहे. जर तुमच्या पिंडऱ्यांमध्ये वेदना होत असतील तर डॉक्टर तुम्हाला काही स्ट्रेचिंग सांगू शकतात ज्यांच्या मदतीने तुम्ही वेदनेमधून मुक्त होऊ शकता.

फिजिकल थेरेपी: हलक्या इलाजानंतर डॉक्टर तुम्हाला फिजिकल थेरेपीने आराम पोहोचवण्याचे देखील काम करू शकतात. जेव्हा तुम्हाला खूप जास्त वेदना आणि सूज होते तेव्हा फिजिकल थेरेपीचा वापर केला जातो ज्यानंतर तुम्हाला काही प्रमाणात आराम मिळू शकतो. यामुळे तुमच्या शारीरिक क्रिया पुन्हा पासून सुरु होण्यास मदत मिळते. यासाठी वेगवेगळी तंत्रे वापरली जातात.

औषधे: जेव्हा तुम्हाला अनेक इलाजांच्या विकल्पानंतर देखील आराम मिळत नाही तेव्हा तुमच्यासाठी डॉक्टर काही औषधे देऊ शकतात. ज्याद्वारे तुमच्या स्नायूंना आराम मिळतो.

बचाव: वजन वाढल्यामुळे तुमच्या पिंडऱ्यांमध्ये वेदना होऊ शकतात यासाठी हे जरुरीचे आहे कि तुम्ही तुमचे वजन नेहमी नियंत्रणात ठेवावे आणि लठ्ठपणा पासून वाचावे. धूम्रपान तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक असते, हे तुमच्या स्नायुंना देखील खराब करण्याचे काम करते. यामुळे तुम्ही धुम्रपान कमी करण्याचा प्रयत्न करावा. किंवा पूर्णपणे बंद करावे. नियमित रूपाने शरीरामध्ये पाण्याची पर्याप्त मात्रा बनवून ठेवावी, शरीरामध्ये पर्याप्त मात्रामध्ये असलेले पाणी तुम्हाला अनेक आजारांपासून सहजरीत्या दूर करू शकते.

Leave a Comment