टीव्ही इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे जिथे खूप पैसा आहे आणि येथून खूप स्टार फेमस होतात. अनेक असे स्टार्स आहे जे येथे प्रसिद्ध झाल्यानंतर बॉलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण केले आहेत. या लिस्टमध्ये आपण सुशांत सिंह राजपूत, हिना खान, मौनी रॉय, अंकिता लोखंडे यांना घेऊ शकता. तर दुसरीकडे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या दमदार अंदाज आणि अदाकारीसाठी फेमस आहेत. यामध्ये शिल्पा शिंदे, दिव्यांका त्रिपाठी, सुरभि चंदना, सुरभि ज्योति, श्रद्धा आर्य सामील आहेत. यांना सर्वांना दर्शक खूप पसंत करतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या प्लस साईज अभिनेत्रींबद्दल ज्यांनी प्लस फिगर असूनदेखील इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमवले आहे.

भारती सिंह :- टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कॉमेडी क्वीन म्हणून प्रसिद्द असणारी भारतीने कधीच आपल्या फिगरमुळे करियरला अडथळा येऊ दिला नाही. तिने द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजपासून आपल्या करियरची सुरवात केली होती आणि या शोनंतर ती अचानक फेमस झाली. या शोनंतर ती अनेक शोमध्ये पाहायला मिळाली ज्यामध्ये कॉमेडी सर्कस 3 का तड़का, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस के सुपरस्टार्स, कॉमेडी सर्कस का जादू, जुबली कॉमेडी सर्कस हे शो देखील सामील आहेत. सध्या ती आपल्या कॉमेडीने सर्वाना हसवून वेडे करत असते. भारती सध्या कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतीने आपला स्वतःचा शो देखील केला आहे ज्याने नाव खतरा, खतरा, खतरा असे आहे. भारती आपल्या फिगरमुळे नेहमी ट्रोल होत असते परंतु तिला याचा काही फरक पडत नाही.अंजलि आनंद :- ढाई किलो प्रेम मध्ये पाहायला मिळालेली अंजली आनंदसुद्धा खूपच हेल्दी आहे परंतु आपल्या फिगरकडे दुर्लक्ष करून तिने अ‍ॅक्टिंगमध्ये खूप नाव कमावले आहे. तीला या शोमध्ये दर्शकांकडून खूप प्रेम मिळाले परंतु ती खूपच ट्रोल झाली होती. या शो साठी तिने १०८ किलो वजन वाढवले होते. यानंतर तिला वेबशोमध्ये देखील पाहिले गेले आणि त्यानंतर तिने कुल्फी कुमार बाजेवाला मध्ये काम केले. कुल्फी कुमार बाजेवाला शोमध्ये ती आपल्या फिगर आणि अ‍ॅक्टिंगमुळे खूप फेमस झाली होती. या शोनंतर ती खूपच लोकप्रिय झाली परंतु तिला आजही ट्रोल केले जाते.
डेलनाज ईरानी :- टीव्हीच्या अनेक शोमध्ये आपली जादू दाखवलेली डेलनाज ईरानीनेसुद्धा आपल्या फिगरला आपल्या करियरच्या आड येऊ दिले नाही परंतु आपल्या फिगरमुळे ती खूपच ट्रोल झाली होती. आज ती टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि दर्शकहि तिला खूप प्रेम देतात. तिने आपल्या करियरची सुरवात टीव्ही शो सीआईडी मधून केली होती यानंतर ती एक महल हो सपनो का, यस बॉस, हम सब बाराती, करम अपना-अपना, नच बलिये, क्या मस्त है लाइफ, क्या हुआ तेरा वादा, बिग बॉस ६ मध्ये पाहायला मिळाली आणि तिने अनेक चित्रपट देखील केले आहेत. डेलनाज ईरानीद्वारे काम केलेल्या चित्रपटांमध्ये दिल ने जिसे अपना कहा, प्यार में ट्विस्ट, भूतनाथ, शो बीज, खलबली, चार यार, टूनपुर का सुपरहीरो, पेइंग गेस्ट, मिलेंगे-मिलेंगे चित्रपट सामील आहेत.रयतशा राठौर :- टीव्ही शो बढ़ो बहु मध्ये पाहायला मिळालेली रयतशा राठौर आपल्या फिगरमुळे नेहमी ट्रोल होत असते. या शोनंतर खूप दर्शकांना ती पसंत आली परंतु असे काही लोक आहेत ज्यांनी तिला खूप ट्रोल केले. अजुनहि रयतशा राठौर ट्रोल होतच असते परंतु ट्रोलर्सला उत्तर देण्यात ती खूप माहीर आहे. तिने हिम्मतीने ट्रोलर्सचा सामना केला आहे. रयतशा राठौरने आपली फिगर आपल्या सफलतेच्या मधी कधीच येऊ दिली नाही आणि तिने खूप नाव कमावले आणि बड़ो बहु शिवाय ती साईड-हीरो शो मध्ये देखील पाहायला मिळाली होती.वाहबिज दोराबजी :- टीवी शो प्यार की एक कहानी मधून आपल्या करियरची सुरवात करणारी वाहबिज दोराबजी सध्या आपल्या शानदार फिगरसाठी ओळखली जाते. तिची फिगर खूपच चांगली आहे असे चाहत्यांचे म्हणणे आहे. वाहबिज दोराबजीचे नाव प्लस साइज़ अ‍ॅक्ट्रेसमध्ये सामील आहे परंतु तिचे लाखो चाहते आहे आणि ती आपली प्लस साइज़ फिगर जबरदस्त फिट ठेवते. तिला बहु हमारी रजनीकांत से मिली थी या शोमधून चांगली ओळख मिळाली आणि या शोमध्ये ती दमदार भुमिकेमध्ये पाहायला मिळाली. वाहबिज दोराबजी अनेक वेळा आपल्या फिगरमुळे ट्रोल होत असते परंतु ती त्यांना उत्तर देण्यातसुद्धा मागे पडत नाही.श्वेता बासु :- टीव्ही शो चंद्रनंदनीमध्ये पाहायला मिळालेली श्वेता प्लस साइज़ फिगर ची मालकिन आहे आणि लोक तिला खूप पसंत करतात. श्वेता ने मराठी, बॉलीवुड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे आणि तिच्या फिगर मुळे ती खूपवेळा ट्रोल झाली आहे. श्वेताने ट्रोलर्सला घाबरून आपले वजन कधीच कमी केले नाही तर आजसुद्धा ती प्लस साइज़ आहे ट्रोल होऊन सुद्धा ती फेमस आहे. श्वेताने गेल्या वर्षी आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केले ज्याच्यासोबत ती खूप काळ लिव-इनमध्ये राहिली होती परंतु आता दोघांचाही संबंध वेगळा आहे कारण दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.अक्षया नाईक :- टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या प्लस साइज़ साठी ट्रोल झालेल्या अक्षया नाईकने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. ती आपल्या फिगरमुळे खूप ट्रोल झाली परंतु आपल्या फिगर मुळे तिने अ‍ॅक्टिंगमधून माघार घेतली नाही. तिने आपल्या दमदार अभिनयाने दर्शकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केले. अक्षया नाईक शो ढाई किलो का प्रेममध्ये दिसली होती आणि याशिवाय ती वेब सीरीज अनटैगमध्ये सुद्धा दिसली होती. तिने आपल्या प्लस साइजमुळे देखील छोट्या पडद्यावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आज ती इंडस्ट्रीमध्ये खूप फेमस आहे.अविका गौर :- टीव्ही शो बालिका वधूमध्ये काम केल्यानंतर फेमस झालेली अविका गौर आता इंडस्ट्रीमध्ये कमीच पाहायला मिळते परंतु तिला दर्शक विसरू शकले नाहीत. अविकाची फिगरसुद्धा प्लस साइज़ आहे परंतु इंडस्ट्रीमध्ये तिने आपली खूप चांगली ओळख निर्माण केली आहे. ससुराल सिमर का मध्ये रोलीची भूमिका साकारून ती घरा-घरात फेमस झाली आणि आजच्या काळामध्ये लोक तिला रोली म्हणूनच ओळखतात. अविका आधी खूपच मोठी होती परंतु आता ती थोडी स्लिम झाली आहे. आपल्या फिगरमुळे देखील ती नेहमी ट्रोल होत असते आणि ट्रोलर्सला प्रत्युत्तर देण्यात ती कधीही मागे हटत नाही.