गरुड पुराणानुसार ह्या सवयी अपयश आणि दुःखाचे कारण बनतात, आजच सोडून द्या या सवयी !

By Viraltm Team

Published on:

हिंदू धर्मामध्ये अनेक पुराण आणि शास्त्र आहेत, ज्यामध्ये प्राचीन काळ आणि देवी देवतांसंबंधित कथा, धर्माच्या गोष्टी आणि पाप-पुण्याच्या नोंदी आहेत. अशा पुराणांपैकी एक पुराण म्हणजे गरुड पुराण. गरुड पुराणामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे, ज्यामध्ये जगाच्या निर्मितीबद्दल सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त मानवी जीवनाशी संबंधित अशा अनेक गोष्टीदेखील सांगण्यात आल्या आहेत ज्या आपल्या जीवनातून काढून टाकल्या पाहिजेत. गरुड पुराणामध्ये अशा अनेक सवयींचा उल्लेख करण्यात आला आहे ज्या मनुष्याच्या जीवनामधील दुख आणि असफलतेचे कारण बनतात.

घमंड :- घमंड हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक राजा-महाराजांचे त्यांच्या घमंडामुळे राज्ये उध्वस्त झाली. आपल्या सफलतेवर, धन धान्यावर घमंड करने आणि दुसऱ्यांना खालच्या दर्जाची वागणूक देणे यामुळे लोकं आपल्यापासून दूर होतात. गरुड पुराणानुसार घमंडी व्यक्ती जी दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करते, ती पापाची भागीदार बनते, आणि यांचा घमंडच यांच्या आयुष्यामध्ये दुःखाचे कारण बनते.दुसऱ्यांच्या सफलतेवर जळणे :- काही लोक असे असतात जे आपल्या जवळच्या लोकांच्या सफलतेवर खूप जळत असतात. दुसऱ्यांच्या सफलतेवर त्यांना ईर्ष्या होते आणि हे मनातल्यामनात कुढत राहतात. गरुड पुराणानुसार दुसऱ्यांच्या सफलतेवर ईर्ष्या करने, मानसिक तणाव निर्माण करते. मानसिक तणावामुळे जीवनामध्ये अशांती आणि असंतोष उत्पन्न होतो. यामुळे व्यक्तीने कधीही दुसऱ्यांच्या सफलतेवर जळू नये.

दुसऱ्यांच्या संपत्तीवर नजर ठेवणे :- जीवनामध्ये कधीही दुसऱ्यांच्या धनावर नजर ठेऊ नये. दुसऱ्या व्यक्तींच्या धनावर नजर ठेवणे, किंवा बेईमानी करून धन प्राप्ती करणे, धोखा देणे गंभीर पापाचे भागीदार बनवते. अशा व्यक्तीचे जीवन हे नेहमी दुखाने भरलेले असते. यासाठी नेहमी आपल्या कामावर आणि कौशल्यांवर विश्वास ठेवला पाहिजे.वाईट चीतणे :- बरेच लोकांना दुसऱ्यांचे वाईट चीतणे, पाठीमागे वाईट बोलण्याची सवय असते. त्यांची हि सवय त्यांच्या जवळच्या व्यक्तींना दूर करण्याचे काम करते. दुसऱ्यांच्याबद्दल चुकीची अफवा पसरवणे हे पापाचे भागीदार बनवते, त्याचबरोबर समाजामध्ये यामुळे नकारात्मक आदर निर्माण होतो.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

Leave a Comment