बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या करियरची सुरवात मॉडेलिंगपासून केली होती आणि हळूहळू बॉलीवूडमध्ये ते आपले पाय रोवत गेले आणि आता ते बॉलीवूडमधील प्रसिद्ध स्टार झाले आहेत. अशा कलाकारांची एक लांबलचक यादी आपल्याला पाहायला मिळते. आज आम्ही अशाच अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिने आपल्या करियरची सुरवात मॉडेलिंगपासून केली होती आणि आता आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वाना घायाळ करत आहे.

बिपाशा बासूने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात २००१ मध्ये अजनबी या चित्रपटामधून केली होती. या चित्रपटामध्ये अक्षय आणि बॉबी देओलसुद्धा मुख्य भूमिकेमध्ये होते. जेव्हा या चित्रपटाची शुटींग सुरु होती त्यावेळी शुटींगच्या सेटवर असे काही घडले होते ज्यांमुळे करीना आणि बिपाशा एकमेकींच्या शत्रू बनल्या होत्या. वास्तविक करीनाचे डिझाइनर विक्रम फडनिस बिपाशाची मदत करत होते आणि हि बाब करीनाला पसंत पडली नाही आणि ती बिपाशाला ब्लँक कँट सुद्धा म्हणाली. या कारणामुळे करीना आणि बिपाशामध्ये सेटवर कडाक्याचे भांडण झाले. असेसुद्धा ऐकण्यात आले होते कि करीनाने बिपाशाला थप्पडसुद्धा मारली होती.२००१ मध्ये फिल्मफेरच्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बिपाशा म्हणाली होती कि, या छोट्याश्या कारणाला उगाचच जास्त डोक्यावर घेण्यात आले. जर करीनाला डिझायनरमुळे त्रास होता तर त्यामध्ये मला का ओढण्यात आले. हे करीनाचे बालिश कृत्य होते, आता कधीही मी करीनासोबत काम करणार नाही. एका वर्षानंतर करीनानेहि एका मुलाखतीदरम्यान असे म्हंटले होते कि, बिपाशाला तिच्या टँलेंटवर विश्वास नाही, ती आपल्या ४ पानाच्या मुलाखतीमध्ये ३ पानापर्यंत माझ्याबद्दलच बोलली आहे. तिने आपल्या कामाबद्दल काहीच वक्त्यव्य केले नाही. मला तर असे वाटते कि तिला सर्व पब्लिसिटी विक्रम फड़नीस यांच्यामुळे झालेल्या भांडणामुळेच मिळाली आहे.

यानंतर या दोघींमध्ये कँट फाईटच्या बातम्या नेहमी येत होत्या. तथापि २००८ मध्ये जेव्हा करीना आणि सैफ एकमेकांना डेट करत होते त्यावेळी करीनाने बिपाशाला एका पार्टीमध्ये आमंत्रित केले होते. यानंतर या दोघींमधील संघर्ष संपुष्टात आला आणि आता त्या चांगल्या फ्रेंड्स आहेत.