सुरेश वाडकर यांनी धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या स्थळास दिला होता नकार, कारण जाणून हैरान व्हाल !

By Viraltm Team

Published on:

आपल्या स्वरांनी मराठी सोबत हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये ९० दशकात सुरेश वाडकर यांनी आपले वेगळे स्थान निर्माण करून बालीवूडमध्ये खास ठसा उमटवला होता. सुरेश वाडकर यांनी मराठी, हिंदी, कोकणी, भोजपुरी, गुजराती, मल्याळी, बंगाली, सिंधी, चित्रपटात तसेच उर्दू भाषेत अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. सुरेश वाडकर यांनी आपल्या मधुर व सुरेल गायनाने रसिकांना अक्षरशः घायाळ केले होते. बॉलिवूडमधील सुपरहिट गाणी गाणाऱ्या सुरेश वाडकर यांनी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित चे स्थळ नाकारले होते. तुम्हाला हे ठाऊक आहे का? तुम्हाला आम्ही आज याबद्दल सांगणार आहोत.माधुरी दीक्षितचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न गाठ बांधणे अगोदर माधुरीच्या मातापित्यांनी बॉलीवूडचे सुपरहिट सिंगर सुरेश वाडकर यांचे स्थळ पाहिले होते. परंतु सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षितच्या ह्या स्थळास नकार दिला. सुरेश वाडकर यांनी माधुरी दीक्षित च्या स्थळास होकार दिला असता तर कदाचित माधुरी दीक्षित चे लग्न सुरेश वाडकर यांचेसोबत झाले असते.माधुरी दीक्षितच्या माता-पित्याची इच्छा होते की, माधुरीने चित्रपटात काम करण्यापेक्षा लग्न करून संसार थाटावा. त्यामुळे माधुरीच्या माता पित्यांनी माधुरी करिता वर शोधायचे काम सुरु केले होते. माधुरीला एकीकडे सिनेमांमध्ये काम करण्याचे स्वप्न पडत होते. तर त्याउलट मात्र माधुरी दीक्षितच्या मातापित्यांना माधुरी करिता वर शोधण्यात मग्न होते. दरम्यान माधुरीच्या मातापित्यांनी बॉलीवूड चे सुपरहिट सिंगर सुरेश वाडकर यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव पाठवला.सुरेश वाडकर बॉलिवूडमध्ये तेव्हा नवोदित गायक म्हणून नावारूपास व उदयास येत होते. ज्यावेळी माधुरीच्या मातापित्यांनी सुरेश वाडकरा समोर लग्नाचा प्रस्ताव पाठवला तेव्हा सुरेश वाडकर यांनी स्थळास थेट नकार दिला. वाडकरांनी असे कारण सांगितले की माधुरी दीक्षित ही खूप सडपातळ आहे. सुरेश वाडकर यांच्या नकाराने माधुरी दीक्षित चे माता-पित्यांना खूप दुःख झाले. चांगले स्थळ हातचे गेले असे माधुरी दीक्षित चा माता-पित्यांना वाटत होते.सुरेश वाडकर यांनी एक प्रकारे बॉलीवूड चे होणारे नुकसान वाचवले असेच म्हणावे लागेल आणि त्यांच्या नकारामुळे माधुरी दीक्षितचा मात्र एकप्रकारे फायदाच झाला. त्यानंतर माधुरी दीक्षितच्या इच्छेप्रमाणे तिला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली. माधुरी दीक्षितने ह्या संधीचे सोने करत. बॉलीवूडला खलनायक, हम आपके है कौन, बेटा, तेजाब, साजन, असे अनेक एकापाठोपाठ सुपरहिट चित्रपट बॉलीवूड ला दिले व आपल्या सर्वांना आपली सर्वांची लाडकी बॉलिवूडची धकधक गर्ल स्वरूपात माधुरी दीक्षित मिळाली.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment