क्रिकेट जगतामधील खेळाडूंकडे पैशांची काहीच कमतरता नाही, यामुळे सर्व खेळाडू हे ग्लॅमरस लाईफ जगतात आणि महागातले महाग छंद देखील ठेवतात. काही खेळाडू तर ब्रँडेड कपडे ब्रँडेड गाड्या यांचे शौक ठेवतात. पण आज आम्ही एक अशा भारतीय टीमच्या क्रिकेटरच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत जी ब्रँडेड कपडे नाही तर ब्रँडेड विचार ठेवते. ती फक्त दाखवण्यासाठी ब्रँडेड कपडे घालत नाही तर ब्रँडेड विचार ठेवून लोकांची मदत करण्यासाठी नेहमी पुढे येत असते.
सुरेश रैना त्या खेळाडूचे नाव आहे. उत्तर प्रदेशचा जबरदस्त डावखुरा फलंदाज सुरेश रैना आज भले हि भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे परंतु त्याच्या भारतीय संघाच्या योगदानाबद्दल आणि त्याच्या प्रदर्शनाबद्दल नाकारता येणार नाही. सुरेश रैनाच्या पत्नीबद्दल बोलायचे झाले तर तिचे नाव आहे प्रियांका चौधरी. प्रियांका हि लग्नाच्या अगोदर नेदरलँडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करायची.प्रियांका चौधरी आता विदेशामध्ये नोकरी करत नाही तर भारतामध्ये राहून ग्रासिया रैना फाउंडेशनचे संचालन करते. तुम्हाला हे जाणून आनंद होईल कि सुरेश रैनाच्या मुलीचे नाव ग्रासिया आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रियंका चौधरी रैना गरीब महिलांना सक्षम बनण्यास आणि स्वतःच मुलांशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास प्रेरणा देते.
त्याचबरोबर ती गरीब स्त्रियांना गरोदरपण, बाळ आणि बाळंतपणाच्या दरम्यान आणि नंतरच्या निरोगी स्वस्थ अन्नाबद्दल जागरूकदेखील करते. ग्रासिया रैना फाउंडेशनच्या शिवाय सुरेश रैनाची पत्नी प्रियांका चौधरी रैनाने Red FM सोबत “पाळणा” शो देखील केला होता.याशिवाय ती दिल्ली एनसीआर फूड बँक नेटवर्कशीही जोडली गेली आहे ज्यामार्फत गरजू मुलांना आणि मातांना पौष्टिक आहार पुरवला जातो. यावरून आपण असे म्हणू शकतो कि या भारतीय खेळाडूची पत्नी हि ब्रँडेड कपडे नाही तर ब्रँडेड विचार ठेवते.