30 ऑगस्ट 1990 मध्ये आलेला दूध का कर्ज हा चित्रपट त्यावेळी चांगलाच गाजला. या चित्रपटाचे कथानक संतोष सरोज व राजकुमार बेदी यांनी लिहिले होते. जॅकी श्रॉफ आणि नीलम कोठारी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका निभावल्या होत्या. माझा मी तुम्हाला या लेखाद्वारे या चित्रपटात काम करणार्‍या कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील साथीदार कोण याबद्दल माहिती देणार आहोत.

१) जॅकी श्रॉफ – दूध का कर्ज या चित्रपटात अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी पार्वती चा मुलगा सूरज ही भूमिका निभावली होती. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. जॅकी श्रॉफ यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव आयशा दत्त असे असून १९८७ मध्ये त्यांनी तिच्याशी विवाह केला.
२) नीलम कोठारी – ऐंशीच्या दशकातील सुंदर अभिनेत्रींमधील एक सुंदर अभिनेत्री म्हणून नीलम कोठारी यांना ओळखले जाते. दूध का कर्ज या चित्रपटात नीलम कोठारी यांनी सुरज च्या प्रेमिकेचे व रघुवीर सिंह यांच्या मुलीची रेशमाची भूमिका निभावली होती. नीलम कोठारी यांच्या पतीचे नाव समीर सोनी असून 2011 मध्ये नीलम समीर सोबत विवाहबद्ध झाल्या.
३) गुलशन ग्रोवर – बॉलिवूड अभिनेता गुलशन ग्रोव्हर यांनी दूध का कर्ज या चित्रपटात अजित् सिंह ही भूमिका निभावली होती. गुलशन ग्रोवर यांच्या पत्नीचे नाव कशिश ग्रोवर होते परंतु 2002 मध्ये त्यांनी कशिश ला घटस्फोट दिला.
४) प्रेम चोपडा – दूध का कर्ज या चित्रपटात प्रेम चोपडा यांनी संपत ही भूमिका निभावली होती. प्रेम चोपडा यांच्या पत्नीचे नाव उमा चोपडा असे असून 1969 मध्ये त्यांनी उमा सोबत लग्न केले होते.

५) अरुणा इराणी – दूध का कर्ज या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांच्या आईची म्हणजेच पार्वतीची भूमिका निभावणाऱ्या अरुणा इराणी यांच्या पतीचे नाव कुकु कोहली असे आहे. कुकु कोहली हेसुद्धा एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. यांनीसुद्धा अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.