आपल्या विनोदी अभिनयाच्या बळावर गेल्या कित्तेक वर्षांपासून दर्शकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे राजपाल यादव. राजपाल यादवने अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम केले आहे.
जवळपास २० वर्षांपासून अभिनेता राजपाल यादव बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. आज त्याचा खूप मोठा चाहता वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. राजपाल यादव सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय असल्याचे पाहायला मिळतो.
आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून तो आपले आणि आपल्या कुटुंबाचे फोटो तो नेहमी शेयर करत असतो. सध्या राजपाल यादव वेगळ्याच कारणामुळे खूपच चर्चेमध्ये आला आहे. याला कारणीभूत आहे त्याची दुसरी पत्नी जिचे नाव राधा आहे.
अभिनेता राजपाल यादवने करुणासोबत पहिले लग्न केले होते. मात्र करुणा राजपालला सोडून या जगामधून निघून गेली. त्यानंतर त्याने राधासोबत दुसरे लग्न केले. राधा बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटापासून नेहमी दूर राहते.
View this post on Instagram
सुरुवातीच्या काळामध्ये राधा बँक कॅशिअर म्हणून काम करत होती. २००२ मध्ये राजपाल यादव आणि राधा यांची भेट कॅनडामध्ये झाली होती. या दरम्यान ते दोघे प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले. राजपाल यादवची पत्नी राधा राजपालपेक्षा तब्बल ९ वर्षांनी लहान आहे.
राजपालने १९९९ मध्ये दिल क्या करे चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. राजपालला एकूण तीन मुली आहेत. यामध्ये ज्योती हि त्याच्या पहिल्या पत्नीची मुलगी असून राधापासून त्याला दोन मुली आहेत.