राहुल वैद्यने नॅशनल टीव्हीवर गर्लफ्रेंड दिशा परमारला प्रपोज काय केले सोशल मिडियावर सध्या धुमाकूळ मजला आहे. दिशाच्या इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या वेगाने वाढू लागली आहे. लोकांना जाणून घ्यायचे आहे कि शेवटी ती मुलगी कोण आहे जिने बिग बोसमध्ये खडूस म्हणून ओळखला जाणारा राहुल वैद्यचे हृदय चोरले आहे. दिशा देखील राहुल प्रमाणे ग्लॅमर इंडस्ट्रीमधून आहे, पण ती गात नाही. दिशा एक मोडल आणि अभिनेत्री आहे. सोशल मिडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
वाढत आहेत फॉलोअर्स: दिशा परमारच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या फॉलोअर्सच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. कालपर्यंत जेव्हा राहुल वैद्यचा प्रपोजलवाला प्रोमो आउट झाला नव्हता तेव्हा दिशाचे ४ लाख ४० हजार पर्यंत फॉलोअर्स होते, पण आज गुरुवारच्या सकाळपर्यंत तिच्या फॉलोअर्सची संख्या ४ लाख ८० हजारच्या पुढे गेली आहे. हे साफ आहे कि चाहते तिच्यासाठी किती उत्सुक आहेत.
राहुलने केले प्रपोज: राहुल वैद्यने ११ नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केले आहे. त्याने आपल्या टीशर्टवर तिचे नाव लिहिले, आणि हृदय बनवले. राहुल तिला गेल्या २ वर्षांपासून ओळखतो आणि या घरामध्ये येऊन त्याला आता तिची कमी वाटत आहे. असे वाटत आहे कि त्याच्या लाईफमध्ये तीच आहे जिच्यासोबत तो आपले आयुष्य घालवू इच्छित आहे. राहुलने अंगठीसोबत दिशाला प्रपोज केले आहे.
अभिनेत्री आहे दिशा, सोशल मिडियावर व्हायरल होतात ग्लॅमरस फोटो: दिशा परमार एक टीव्ही अभिनेत्री आहे, ती मोडेलिंग देखील करते. अनेक जाहिरातीमध्ये दिसलेली दिशा, राहुल वैद्यसोबत एका म्युजिक व्हिडिओमध्ये देखील पाहायला मिळाली आहे. या व्हिडिओच्या सेटवर हे दोघे भेटले आणि मित्र बनले. सोशल मिडियावर राहुल वैद्यसोबत दिशाचे अनेक फोटो आहेत. याशिवाय दिशा इंस्टाग्रामवर खूपच अॅाक्टिव असते. तिचे ग्लॅमरस फोटो सतत व्हायरल होत असतात. दिशाने सोशल मिडिया चाहत्यांसोबत अनेक फोटो शेयर केले आहेत. ११ नोव्हेंबरला तिचा वाढदिवस होता आणि या निमित्ताने तिने आपले काही फोटो चाहत्यांसोबत शेयर केले होते.