यांनी आपल्या मुलीच्या नावावर केली आठ हजार करोड रुपयांची संपत्ती !

By Viraltm Team

Published on:

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व बिझनेसमन असलेले मुकेश अंबानी यांनी त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे जाळे संपूर्ण देशात पसरवून ठेवले आहे. याच कारणामुळे मुकेश अंबानी यांना संपूर्ण जगभरातील ९ वे श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाते. मुकेश अंबानी त्यांच्या लाडक्या कन्येच्या म्हणजेच ईशा अंबानी च्या नावावर तब्बल ८००० करोड रुपयांची संपत्ती केली आहे. काही दिवसांपूर्वीच इशा तिच्या वडिलांसोबत जिओ वंडरलैंड च्या लॉन्च पार्टी मध्ये दिसली होती.
जेव्हापासून मुकेश अंबानींनी भारतामध्ये जिओ ब्रँड लॉन्च केला तेव्हापासून भारतात एक वेगळेच क्रांती निर्माण झाली आहे. २०१९ च्या अखेरीस मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा जिओ वंडरलैंडची लॉन्चिंग केली. या वंडरलैंड मध्ये लहान मुलांसाठी वेगवेगळ्या मनोरंजनात्मक गोष्टी आहेत ज्यांचा त्यांना भरपूर फायदा होऊ शकतो.
लॉन्च पार्टीमध्ये मुकेश अंबानी त्यांच्या मुलीसोबत पोहोचले. ज्यावेळी कॅमेऱ्यांनी ईशा अंबानीस त्यांच्या कॅमेऱ्यात टिपले त्यावेळी ती खूपच खूश दिसत होती. एवढी श्रीमंत व्यक्ती असून देखील मुकेश अंबानी यांनी पार्टीमध्ये साधी शर्ट व पॅंट परिधान केला होता. या पार्टीमध्ये बिजनेस विश्वातील व्यक्तींपेक्षा क्रिकेट, बॉलीवूड मधील व्यक्तींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.
आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे की मुकेश अंबानी हे जगातील ९ वे श्रीमंत व्यक्ती आहे. यावर्षी त्यांची संपत्ती ३८०७०० रु. ने वाढली असून त्यातील ८००० करोड रुपयांची संपत्ती त्यांनी इशाच्या लग्नापूर्वीच तिच्या नावावर केली आहे. मुलीस कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये यासाठी त्यांनी तिची आधीच सोय करून ठेवली आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्री दरवर्षी भरभराट करत असते. त्यामुळे मुकेश अंबानी यांना ही रक्कम तितकीशी मोठी नक्कीच नाही आहे.

Leave a Comment