जर तुम्ही कोविड रुग्ण आहात आणि घरामध्येच इलाज करत असाल आणि ऑक्सिजनची लेवल कमी होऊ लागली तर रुग्णालयाकडे धाव घेऊ नये. सर्वात आधी लक्षणे समजून घ्या. ऑक्सिजनची लेवल ९५ च्या वर असेल तर टेंशन घेऊ नका आणि कमी झाल्यास घरामध्येच राहून यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. भरतामध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. घरामध्येच इलाज करत असलेल्या रुग्णांनी हे जाणून घेणे जरुरीचे आहे कि ऑक्सिजन लेवल कमी होण्याची कोणती लक्षणे आहेत आणि कधी रुग्णालयामध्ये जावे.
घरीच चेक करत राहा ऑक्सिजन सॅचुरेशन :- रुग्णांनी आपले ऑक्सिजन सॅचुरेशन वेळोवेळी चेक करत राहिले पाहिजे. यासाठी घरामध्ये पल्स ऑक्सीमीटर डिव्हाइस ठेवावे आणि हाताच्या बोटाला लावून चेक करत राहावे. रीडिंगमध्ये जर ९४ पेक्षा जास्त लेवल दिसत असेल तर तुम्ही सुरक्षित आहात.
ऑक्सिजन सॅचुरेशन ९० किंवा त्यापेक्षा कमी झाल्यास असू शकतो धोका :- कोरोना झाल्यास वेगाने ऑक्सिजनची पातळी घटू लागते. अशामध्ये रुग्णाची एसपीओ २ लेवल ९४ ते १०० च्या दरम्यान राहते तर तो हेल्दी असण्याचे लक्षण आहे. पण जर लेवल ९४ च्या खाली आली तर हाइपोक्सेमियाला ट्रिगर करू शकतो. असे झाल्यास अनेक समस्या येऊ शकतात. जर ऑक्सिजन सॅचुरेशन लेवल ९० पेक्षा खाली आली तर हि रुग्णासाठी धोक्याची घंटा असू शकते. अशामध्ये रुग्णाला त्वरित रूग्णालयात दाखल करायला हवे.
९१ ते ९४ दरम्यान ऑक्सिजनची लेवल असेल तर काय करावे :- जर रुग्णाची ऑक्सिजनची लेवल ९१ ते ९४ दरम्यान असेल तर त्याला घर्मध्ये प्रोनिंग एक्सरसाइज करायला सांगावे किंवा प्रोनिंग पोजीशनमध्ये झोपवावे आणि वेगाने श्वास घेण्यास सांगावे. याच्या मदतीने शरीरामध्ये ऑक्सिजनची लेवल वाढण्यास मदत होते.
चेहऱ्याचा रंग गडद होणे :- शरीरामध्ये जर ऑक्सिजनची लेवल कमी असेल तर चेहऱ्याचा रंग निळा पडू लागतो आणि ओठ देखील निळे पडतात. याला स्यानोसिसचे लक्षण मानले जाते. वास्तविक हेल्दी ऑक्सीजेनेटेड ब्लडमुळे आपली स्कीन लाल किंव अगुलाबी ग्लो करते पण जेव्हा शरीरामध्ये ऑक्सिजनची कमी होऊ लागते तेव्हा अशी लक्षणे दिसू लागतात.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.