जगातील सर्वात महान कूटनीतिज्ञ आणि राजनीतिज्ञ कौटिल्य ज्यांना आपण आचार्य चाणक्य म्हणून ओळखतो. त्यांनी आपल्या आयुष्यातील संपूर्ण ज्ञान आणि अनुभव एका ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहेत आणि याचे नाव आहे चाणक्य नीति. चाणक्य नीतिमध्ये मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. यामध्ये मनुष्याला मेहनत करणे, समाजामध्ये त्याची ओळख बनवणे यापासून ते त्याच्या सफलतेच्या उंचीवर पोहोचण्यापर्यंतचा उल्लेख केला गेला आहे.

चाणक्य नीतिमध्ये लिहिलेल्या गोष्टी इतक्या प्रभावशाली आहेत कि जर एखाद्या व्यक्तीने त्या आपल्या आयुष्यामध्ये अवलंबल्या तर त्याचे आयुष्य सुखी आणि सफल होऊन जाते. आज आम्ही तुम्हाला चाणक्य नीतिसंबंधी काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्यामध्ये आचार्य चाणक्यने काही अशा जागांबद्दल वर्णन केले आहे. जिथे एका समजदार व्यक्तीने कधीही थांबू नये, चला तर मग जाणून घेऊया ते कोणकोणते स्थान आहेत.

आजीविका :- चाणक्यनुसार एका व्यक्तीने अशा स्थानी थांबू नये जिथे आजीविका आणि व्यापाराचे कोणतेही साधन नसते. बिना आजीविकाशिवाय कोणतीही व्यक्ती योग्य प्रकारे आपले जीवन व्यवस्थित जगू शकत नाही आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचे पालनपोषण देखील करू शकत नाही.कायदा :- चाणक्यने सांगितले होते कि अशा स्थानावर कधीही थांबू नये जिथे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेविषयी भय निर्माण होईल. असे स्थान जिथे लोकांच्या मनामध्ये कायद्याविषयी जरासुद्धा भय नसेल, अशा ठिकाणी देखील कधीच राहू नये. अशा ठिकाणी राहणे स्वतःचे आणि कुटुंबाचे जीवन धोक्यात घालण्यासारखे आहे.

लोक लाज :- चाणक्य नीतिनुसार एका व्यक्तीने अशा स्थानावर कधीहि राहू नये जिथे लोकांमध्ये जराही लाज नसे, कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसतील. अशा स्थानी राहिल्यास कधीहि सन्मान प्राप्ती होत नाही. असे स्थान जिथे लोकांच्या मनामध्ये आस्था आणि समाजाप्रती आदर आणि मर्यादा याची भावना असते, अशा ठिकाणीच संस्कार उत्पन्न होते.परोपकार :- ज्या स्थानी राहणाऱ्या लोकांमध्ये परोपकार आणि त्यागाची भावना नसेल, तिथे कधीही राहू नये, कारण ज्या लोकांमध्ये अशी भावना नसेल. ते वेळ आल्यास आपली मदत नाही करू शकणार, तर आपले संबध देखील तोडून टाकतील. म्हणूनच नेहमी अशा स्थानीच राहिले पाहिजे जिथे लोक परोपकारी आणि सभ्य असतील.

त्याग :- चाणक्यनुसार अशा स्थानी कधीच राहू नये जिथे लोकांमध्ये त्याग आणि दानाची भावना नसेल. दान करणे पुण्य कमवण्यासारखे आहे. यामुळे आत्मा पवित्र होतो. अशामध्ये ज्या लोकामध्ये दानाची भावना नसते ते कधीही दुसऱ्यांची मदत करत नाहीत. यासाठी अशा स्थानी कधीही राहू नये.