५ वेळा रिलेशनमध्ये राहिल्यानंतर ‘४३ वर्षाची’ ‘हि’ अभिनेत्री आपल्यापेक्षा १० वर्षे लहान व्यक्तीसोबत करणार लग्न…

By Viraltm Team

Published on:

टीव्हीच्या अनेक पॉपुलर सीरियल्समध्ये आपल्या अभिनयाचे प्रदर्शन करणारी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देशराजच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वास्तविक मृणाल देशराज ४३ वयामध्ये स्वतःपेक्षा १० वर्षे लहान व्यक्ती आशिम मथनसोबत लग्न करणार आहे.

नुकतेच तिने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून मेहेंदी सेरेमनीचे काही फोटो शेयर केले आहे जे तिच्या चाहत्यांना खूपच पसंद पडत आहेत. याशिवाय तिने इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ देखील शेयर केला आहे ज्यामध्ये ती खूपच खुश पाहायला मिळत आहे.

मृणाल देशराजला टीव्हीच्या जगतामधील सर्वात पॉपुलर शो इश्कबाज, महाराणा प्रताप आणि नागिन-३ सारख्या सिरियल्ससाठी ओळखले जाते. याशिवाय देखील तिने आपल्या करियरमध्ये अनेक पॉपुलर शोमध्ये काम केले आहे आणि तिची फॅन फोलोविंग देखील खूप तगडी आहे.

मृणाल देशराजने याच महिन्याच्या ९ तारखेला मुंबईमध्ये आपल्या बॉयफ्रेंड आशिम मथनसोबत एंगेजमेंट केली होती. ज्याचे फोटो देखील तिने सोशल मिडियावरून शेयर केले होते. आता ती आपल्या लग्नाबद्दल खूपच खुश आहे आणि मेहेंदीचे काही फोटो देखील तिने शेयर केले आहेत.

याशिवाय तिच्यासंबंधी एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये मृणाल डार्क पिंक कलरचा लेहेंग्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिने आपले केस देखील खुले सोडले आहेत आणि आपल्या हातामधील मेहेंदी दाखवताना दिसत आहे.

मृणालच्या लग्नाची बातमी तिच्या चाहत्यांना मिळताच ते खूप खुश झाले आहेत आणि त्यांनी तिला लग्नासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे कि, लग्नाचा ग्लो आत्ताच तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. मृणाल देशराज ज्याच्यासोबत लग्न करणार आहे ती तिच्यापेक्षा १० वर्षाने लहान आहे.

मृणाल देशराज एक अशी अभिनेत्री आहे जी ५ वेळा प्रेमात धोका खाल्ली आहे. तथापि तिने खऱ्या प्रेमाचा शोध थांबवला नाही आणि शेवटी ती त्यामध्ये यशस्वी झाली. यानंतर मृणालचे म्हणणे आहे कि तिला भलेहि ५ वेळा हार मिळाली पण तिने कधीच हिम्मत हारली नाही. आता तिला आशिमच्या रूपाने एक खरे प्रेम मिळाले आहे ज्यामुळे ती खूप खुश आहे.

माहितीनुसार मृणाल आणि आशिमची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे २०२१ मध्ये झाली होती. यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. यादरम्यान आशिमने मृणालला गोव्यामद्ये प्रपोज केले आणि त्यांनी लगेच एंगेजमेंट करण्याचा निर्णय घेतला.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment