त्येक मुलीला तिच्या लग्नामध्ये सुंदर दिसायचं असतं. तो दिवस त्या आठवणी चिरंतर जपून ठेवायचा असतात आणि त्या उत्सुकतेमध्ये मुली काहीतरी चुका करून बसतात आणि याचा थेट परिणाम त्यांच्या चेहऱ्यावर वा एकंदरीतच लुकवर पडतो. तर मग तुमचं ही लग्न ठरत असेल तर हा लेख वाचून नक्कीच योग्य माहिती तुम्हाला मिळेल.
हेअर कलर :- कित्येकदा मुली सुंदर दिसण्यासाठी हेअर कलर करतात किंवा केस हायलाईट करतात. पण काही वेळेस उत्सुक होऊन केलेला तो हेअर कलर त्यांचा चेहऱ्याला शोभून दिसत नाही. त्यामुळे लग्नासाठीचा लुक खराब होऊ शकतो. हेअर कलर व्यवस्थित सेटल होण्यासाठी 10 ते 15 दिवस लागतात. त्यामुळे लग्नाचा 4 ते 5 दिवस आधी हेअर कलर केल्यास जो लुक आपल्याला अपेक्षित आहे तो मिळणार नाही. म्हणूनच लग्नापूर्वी जर केस कलर करायचे असतील तर एक 25-30 दिवस आधी कलर करावेत.
हेयरकट :- हेअर कलरप्रमाणे हेअरकट देखील लग्नाच्या 4-5 दिवस आधी करू नये. कधी कधी हेअरकट आपल्याला हवा तसा होतं नाही किंवा तो ब्रायडल लुक ला साजेसा नसतो. महिनाभर आधी हेअरकट केल्यास ते चांगले ठरते.सुंदर दिसण्यासाठीचे उपाय :- सुंदर दिसण्यासाठी तर मुली फेशिअल, ब्लिच, क्लीनअप असे नानाविध प्रकार करतात. पण लग्नाचा 4-5 दिवसआधी ब्यूटी ट्रीटमेंट करणं नुकसानदायक ठरत. कारण कधी कोणाची स्किन सेन्सिटिव्ह असते, कोणाची ड्राय असते, ऑइली असते आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या ब्यूटी ट्रीटमेंट या असतात. पण कधी कधी योग्य प्रॉडक्ट किंवा क्रिम नाही वापरली तर चेहऱ्यावर त्याचा परिणाम होऊन आपला चेहरा खराब होण्याची शक्यता जास्त असते.
फास्ट फूड खाणे :- लग्नामधील आपल्या लूकसाठी सगळेच अनेक ब्युटी ट्रीटमेंट, विविध मेकअप किट्स इत्यादी व याहून ही अनेक गोष्टी वापरतात. पण मित्रहो लग्नाचा आधीचा दिवसांमध्ये फास्ट फूड कमी खावे अन्यथा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची शक्यता असते. जमल्यास पाणी जास्त प्यावे. त्याचसोबत फळांचा रस ही प्यावा त्यामुळे चेहरा उजळतो आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.
व्यायाम :- आपण नेहमी फिट व स्लिम दिसावं यासाठी नेहमी मुली डाएट करतात, व्यायाम योगा करतात. पण लग्नामध्ये अधिक छान, फिट दिसावं यासाठी 10-15 दिवस आधी अगदी हार्ड वर्कआउट करतात. परंतु यामुळे त्या थकतात आणि सोबतच चेहरा ही अगदी फिका पडतो. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपडे कोणते घालायचे हे ठरवल्यानंतर किंवा कपडे शिवण्यासाठी कपड्यांचे माप दिल्यानंतर जर आपण वर्कआऊट करून वजन कमी केले तर आपल्या ड्रेस चा लुक खराब होऊ शकतो. त्यामुळे लग्नाचा दिवसांमध्ये स्वतःला मेन्टेन ठेवणे गरजेचे आहे.
लग्नासाठी लुक बॅलन्स असला पाहिजे :- हेवी लेहंगासाठी हेवी ज्वैलरी आणि अधिक मेकअप आपला लुक खराब करू शकतो. त्यामुळे बॅलन्स लुक असणं महत्त्वाचं असतं. जर हेवी लेहंगा असेल तर लाइट ज्वैलरी घालावी.