काही वर्षांपासून जगभरात सौंदर्य शी संबंधित स्पर्धांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होऊ लागले आहे. आपल्या भारतीय सुंदरीने देखील अशा काही स्पर्धांमध्ये जिंकून आपल्या देशाचे नाव रोशन केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी या सौंदर्य संबंधित स्पर्धा जिंकून बॉलीवूड मध्ये येण्याचा निर्णय घेतला व त्यात यश देखील संपादन केले.

१) जीनत अमान – जीनत अमान ही एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री होती. जीनत यांनी मिस इंडिया पैसिफिक हा किताब जिंकला आणि त्यानंतर बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. त्यांनी कित्येक दशके त्यांच्या बोल्ड आणि काहीशा वेगळ्या अदांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.
२) जुही चावला – आमिर खानचा कयामत से कयामत या चित्रपटातून जुही चावला यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. जुही चावला ची शाहरुख खान सोबत ची जोडी जास्त प्रसिद्ध झाली होती. 1984 सालचा मिस इंडिया हा किताब जुहीचावला हिला मिळाला होता.
३) ऐश्वर्या राय-बच्चन – मिस वर्ल्ड हा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्या राय हीचा प्रवास बॉलीवूड पुरता सीमित न राहता तिने हॉलिवूडमध्ये सुद्धा काम केले. हम दिल दे चुके सनम, पुकार यांसारख्या दर्जेदार चित्रपटातून ऐश्वर्या आणि तिच्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली होती.४) सुष्मिता सेन – 1994 मध्ये जेव्हा ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड बनली होती. तेव्हाच सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स बनली होती. दस्तक या चित्रपटांमधून सुष्मिता सेन हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मै हु ना हा चित्रपट तिचा त्यावेळी खूप चालला होता. चित्रपटांपेक्षा सुष्मिता सेन तिच्या सामाजिक कार्यांसाठी जास्त प्रसिद्ध आहे.
५) लारा दत्ता – अभिनेत्रीला लारा दत्ता हिने 2000 साली मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने अभिनय व मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. अंदाज या चित्रपटामधून लाराने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.
६) प्रियांका चोप्रा – बॉलीवूड तसेच हॉलिवूड मध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजेच प्रियांका चोप्रा. हिला सगळ्यात यशस्वी ब्युटी क्वीन मानले जाते. प्रियंका चोप्रा यांचा नुकताच येऊन गेलेला स्काय इज पिंक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला परंतु त्याचा तिच्या करिअरवर व तिच्या लोकप्रियतेवर काडीचाही फरक पडलेला नाही.
७) नेहा धुपिया – अभिनेत्री नेहा धुपिया हिने कयामत व ज्युली यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. तिच्या बोल्डनेस मुळे ती नेहमीच चर्चेत असते. यासोबतच नो फिल्टर नेहा असा रेडिओवर शोध नेहा करते.
८) दिया मिर्झा – अभिनेत्री दिया मिर्झा हिने आर माधवनचा चित्रपट रहना है तेरे दिल में मधून बॉलीवूडमध्ये प्रवेश घेतला. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटातील गाणी सुद्धा चांगलीच गाजली होती. परंतु या चित्रपटानंतर दिया कोणत्याही खास चित्रपटात दिसली नाही.
९) जॅकलीन फर्नांडिस – जॅकलीन फर्नांडिस हिने 2006 साली मिस श्रीलंका युनिव्हर्स हा किताब पटकावला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश करून अनेक हिट चित्रपट दिले जे बॉक्स ऑफिस वर चांगलेच गाजले.
१०) मीनाक्षी शेषाद्री – सनी देओल सोबत घायल, घातक यांसारखे दर्जेदार चित्रपट देणारी मीनाक्षी शेषाद्री हिने वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली होती. मीनाक्षी आता जरी चित्रपट सृष्टी पासून दूर असल्या तरी त्यावेळी त्यांनी बॉलीवूड इंडस्ट्री चांगलीच गाजवली होती.११) तनुश्री दत्ता – नुकत्याच गाजलेल्या मी टू (Me too) या प्रकरणामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता ही देखील एकेकाळी ब्युटी क्वीन झाली होती. तनुष्री ने 2004मध्ये मिस इंडिया युनिव्हर्स हा किताब पटकावला होता. तनुश्री ने आशिक बनाया यासारखा सुपरहिट चित्रपट दिला होता. त्यानंतर ती काही काळ परदेशात वास्तव्यास होती त्यामुळे चित्रपट सृष्टी पासून दूर होती पण आता मी टू प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आली.
१२) नम्रता शिरोडकर –
वास्तव चित्रपटामुळे प्रसिद्धीत आलेली अभिनेत्री नम्रता शिरोडकर करणे इतरही काही बॉलिवुडमधील चित्रपटांमध्ये काम केले होते. परंतु तिला चित्रपटांमध्ये तितकेसे यश मिळाले नाही म्हणून तिने साऊथ मधील सुपरस्टार महेश बाबू यांच्यासोबत विवाह गाठ बांधली आणि चित्रपट सृष्टीला कायमचा पुर्णविराम दिला.
१३) पूजा बत्रा – अभिनेत्री पूजा बत्रा हिला मिस इंडिया पॅसिफिक हा किताब मिळाला होता. तिने अनिल कपूरच्या विरासत या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. नायक चित्रपटामध्ये देखील तिने काम केले होते. याशिवाय ते मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय असते. परंतु चित्रपटांमधून तिने तिचे विशेष असे नाव कमवले नाही.