बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये फिल्मी कलाकारांचे येणे-जाणे चालूच असते. आज आपण बोलणार आहोत प्रभासबद्दल जो साहो चित्रपटाच्या यशानंतर आता आपला आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त झाला आहे. सध्या प्रभास आपला चित्रपट प्रभास २० साठी खूपच चर्चेमध्ये आहे आणि त्याने या चित्रपटाची तयारी देखील सुरु केली आहे. एका बातमीनुसार प्रभासच्या या चित्रपटामध्ये सलमानची मैने प्यार किया या चित्रपटातील हीरोईन प्रभासच्या आईच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे.होय, सलमानच्या मैने प्यार किया या चित्रपटातून आपल्या करियरची सुरवात करणारी अॅक्ट्रेस भाग्यश्री आता पुन्हा बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करणार आहे. सलमानसोबत स्क्रीनवर रोमांस करणारी हि अॅक्ट्रेस साउथचा सुपरस्टार प्रभासच्या आईची भूमिका साकारणार आहे. हा एक काळाचा बदलेला फेरा आहे जिथे एका बाजूला सलमान अजूनही चित्रपटांमध्ये हिरोची भूमिका साकारत आहे तर दुसरीकडे भाग्यश्रीने चित्रपटानंतर एक मोठा ब्रेक घेतला आणि त्यानंतर आता तिला हीरोईन नाही तर आई बनून कमबॅक करण्याची ऑफर मिळाली आहे.
चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हि एक पीरियड लव स्टोरी आहे, ज्यामध्ये पूजा हेगडे फिमेल लीडमध्ये दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण करत आहेत आणि या चित्रपटातील भाग्यश्रीची भूमिका पूर्णपणे सिक्रेट ठेवण्यात आली आहे. तथापि प्रभास या चित्रपटामध्ये एका ज्योतिष्याच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. अभिनेत्री भाग्यश्रीबद्दल बोलायचे झाले तर भाग्यश्रीने आतापर्यंत तेलुगु आणि कन्नड़ चित्रपटांमध्ये काम केलेले नाही. बॉलीवूडमध्ये भाग्यश्रीने २ ते ३ चित्रपटच केले. आता त्यांच्या चित्रपटाचे शुटींग सुरु झाले आहे आणि या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होईल.
कधी सलमानची अभिनेत्री म्हणून या अभिनेत्रीचा झाला होता डेब्यू, आता प्रभास आई बनून करणार कमबॅक !
By Viraltm Team
Published on: