कुटुंबामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा फक्त घरामध्येच नाही तर आसपासच्या संपूर्ण भागामध्ये शोककळा पसरते. यानंतर सर्वजण मृत व्यक्तीला श्रद्धांजलि देण्यासाठी आणि शोक व्यक्त करण्यासाठी येतात. झारखंडच्या जमशेदपुर जिल्ह्यामध्ये देखील एका वृद्धाच्या निधनानंतर हेच होत होते. पण अचानक तिथे एक माकड आले. त्याने नंतर त्या वृद्धाच्या मृतदेहासोबत जे केले ते पाहून सर्वजण हैराण झाले.
गौरांग चन्द्र पाल चाकुलिया प्रखंडच्या कालापाथर गावामध्ये राहत होते. ते ८० वर्षाचे होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. अंतिम संस्कारच्या अगोदर त्याचा मृतदेह घराच्या अंगामध्ये बाजेवर अंतिम दर्शनासाठी ठेवला गेला होता. यादरम्यान सर्व ओळखीचे लोक येऊन त्यांच्या पार्थिव शरीरावर पुष्प अर्पण करू लागले. यादरम्यान तिचे अचानक एक माकड आले.
हे माकड देखील गौरांग चन्द्र पालच्या मृतदेहाजवळ बसले. ते प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून हात फिरवू लागले. असे वाटत होते जसे ते त्यांना आशीर्वाद देत आहे. इतकेच नाही तर त्या माकडाने देखील इतर लोकांप्रमाणे गौरांग चन्द्र पालच्या पार्थिव शरीरावर पुष्प अर्पण केले. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनुसार माकडाने कोणताही त्रास दिला नाही. ते शांतपणे मृतदेहाजवळ बसून राहिले.
यानंतर गावातील लोक मृतदेह अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन गेले तेव्हा ते माकड देखील त्यांच्या पाठीमागे गेले. माकड चितेजवळ देखील काही वेळ बसून राहिले. तथापि अंतिम संस्कार झाल्यानंतर ते तिथून निघून गेले. अंतिम यात्रेमध्ये सामील झालेले पंचायतचे प्रमुख शिवचरण हंसडा यांनी सांगितले कि हे माकड कुतुहून आले होते हे कोणालाच माहिती नाही. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.
आता हे संपूर्ण प्रकरण खूपच चर्चेचा विषय बनले आहे. प्रत्येकजण हे दृश्य पाहून भावूक झाले होते. जाणून माकडाच्या रुपामध्ये देवच तिथे आला होता असे सर्वाना वाटले. काहींनी म्हंटले कि माकडाचे आणि मृतकचे गेल्या जन्मीचे काहीतरी नाते होते. हा नजारा पाहून लोक हे देखील म्हणत आहे कि प्राण्यांना देखील भावना असतात. त्यांची रक्षा करायला हवी त्यांना त्रास देऊ नये.