बॉलीवूडची प्रसिद्ध अदाकारा करिश्मा सध्या चित्रपटांपासून दूर आहे. पण ती वेब सिरीजमध्ये काम करत आहे. करिश्मा नेहमी कोणत्याना कोणत्या पार्टीमध्ये पाहायला मिळत असते. करिश्मा कपूरने आपल्या करियरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. तिला सर्वात जास्त लोकप्रियता राजा हिंदुस्तानी चित्रपटामधून मिळाली. करिश्माने आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूप सफलता मिळवली. परंतु तिचे वैयक्तिक आयुष्य खूपच अडचणींचे राहिले.

करिश्मा कपूरने २००५ मध्ये संजय कपूरसोबत लग्न केले होते. लग्नानंतर तिने चित्रपटामध्ये काम करने बंद केले. परंतु लग्नाच्या काही काळानंतरच त्यांच्या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. करिश्मा कपूरने आपला पती संजय कपूरविरुद्ध एफआयआर दाखल केली.करिश्माने सांगितले कि, संजय कपूर तिच्यावर खूप अत्याचार करत होते. त्याने माझ्यासोबत फक्त एवढ्यासाठी लग्न केले कि मी फक्त एक सक्सेसफुल अ‍ॅक्ट्रेस होते. करिश्मा पुढे म्हणाली कि, संजयला नेहमीच एक प्रसिध्द आणि पब्लिक फिगर बनायचे होते, कारण त्याच्याजवळ स्वतःची अशी कोणतीच ओळख नव्हती.त्याने माझा ट्रॉफीसारखा वापर केला आणि दिल्लीच्या लोकांमध्ये लोकप्रियता मिळवली. तो मला मारहाण करायचा. २०१६ मध्ये संजय कपूरशी करिश्माने घटस्फोट घेतला. आता करिश्मा आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन स्वतःच करते. असे म्हंटले जाते कि सचदेवमुळे करिश्मा आणि संजयच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला संजय कपूरने २०१७ मध्ये प्रिया सचदेवसोबत लग्न केले.