१७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले गाणे “कांटा लगा” सर्वांनीच पाहिले असेल. या गाण्यामध्ये एक अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळाली होती. तिचे नाव होते शेफाली जरीवाल. १७ वर्षांपूर्वी या गाण्याने खूपच धुमाकूळ घातला होता. या गाण्यामधून शेफालीला रातोरात प्रसिद्धी मिळाली होती आणि ती कांटा लगा गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागली. आजही तिला कांटा लगा गर्ल म्हणूनच ओळखले जाते.

१७ वर्षांनंतर आता शेफाली जरीवाला खूपच बदलली आहे. तिचा जन्म १५ डिसेंबर १९८० रोजी अहमदाबाद गुजरात येथे झाला होता. आता ती ३९ वर्षांची आहे. ज्यावेळी कांटा लगा या गाण्यामध्ये शेफालीने परफॉर्म दिला होता त्यावेळी ती अवघ्या १९ वर्षांची होती. शेफालीने या गाण्याशिवाय १०-१२ आणखी म्यूजिक वीडियोमध्ये काम केले आहे. परंतु नंतर इतर गाण्यांमधून जास्त कमाल दाखवू शकली नाही.२००४ मध्ये प्रदर्शित झालेला सलमान खान आणि अक्षय कुमार अभिनित मुझसे शादी करोगी या चित्रपटामध्ये तिने बिजलीची भूमिका साकारली होती. नंतर ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत रियालिटी शो नच बलिये ५ मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. २०१८ मध्ये तिने एएलटी बालाजीच्या वेब सीरिज बेबी कम ना मध्ये नायिकेची भूमिका साकारली होती. २०१९ मध्ये तिने बिग बॉस १३ या रियालिटी शोमध्येदेखील भाग घेतला होता.जर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिच्या करियरच्या काळामध्ये तिने हरमीत गुलजारसोबत लग्न केले होते. दुर्दैवाने तिचे हे लग्न फक्त ४ वर्षेच टिकले आणि २००९ मध्ये त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर २०१४ मध्ये शेफाली ने पराग त्यागीसोबत दुसरे लग्न केले. पराग आणि शेफालीची जोडी खूपच चांगली आहे. शेफाली तिच्या दुसऱ्या पतीसोबत एक चांगले वैवाहिक जीवन व्यतीत करत आहे.