काजोल आणि अजय देवगन लग्नाच्या वेळी मिडियाशी बोलले होते खोटे, स्वतः केला खुलासा !

By Viraltm Team

Published on:

काजोल आणि अजय देवगनचा चित्रपट तान्हाजी काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता ज्याला दर्शकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही कलाकारांनी चित्रपटाचे चांगलेच प्रमोशन केले होते. काजोल आणि अजय देवगनची जोडी बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. याआधी हे दोघे यू मी और हम या चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळाला होते.

काजोल आणि अजय देवगन यांनी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली. त्यांनी सांगितले कि त्यांची पहिली भेट कशी झाली होती. काजोलने यादरम्यान हेही सांगितले कि त्यांनी लग्नाच्या वेळी मिडियाशी खोटे बोलले होते. काजोल म्हणाली कि, आमची भेट २५ वर्षांपूर्वी हलचलच्या सेटवर झाली होती. मी शुटींगसाठी तयार झाले होते आणि विचारत होते कि माझा हिरो कोण आहे. कोणीतरी मला अजय कडे बोट दाखवून सांगितले कि तो कॉर्नरमध्ये बसलेला तुमचा हिरो आहे. मी त्याला भेटायच्या १० मिनिटे अगोदर त्यांच्याबद्दल खूप वाईट बोलत होते.त्यानंतर आम्ही एकमेकांशी बोलू लागलो आणि आमच्यामध्ये मैत्री झाली. त्यावेळी मी दुसऱ्या कोणालातरी डेट करत होते आणि अजय हि रिलेशनशिपमध्ये होता. पण माझा ब्रेकअप झाला. आम्ही दोघांनी एकमेकांना प्रपोज केले नव्हते. परंतु आम्ही समजलो कि आम्ही एकत्र आहोत. त्यावेळी आम्ही ४ वर्षे एकमेकांना डेट केले होते आणि त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. अजयच्या कुटुंबातील या लग्नाला तयार होते परंतु माझ्या वडिलांनी माझ्यासोबत ४ दिवस बातचीत केली नाही. त्यांची अशी इच्छा होती कि मी माझ्या करियरवर पूर्ण लक्ष केंद्रित करावे.
आम्ही मिडीयाला लग्नाचे स्थळ चुकीचे सांगितले होते. अजय लवकर लग्न उरकण्यासाठी पंडितला लाच देण्याचा प्रयत्न करत होता. काजोलने यादरम्यान हेहि सांगितले कि. कभी खुशी कभी गम या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान ती प्रेग्नंटदेखील होती परंतु तिचा मिसकैरिज झाला. ज्यामुळे ती खूप दुखी झाली होती. त्यानंतर तिने न्यासा आणि युगला जन्म दिला.

Leave a Comment