सलमान खानच्या या अभिनेत्रीचा झाला भीषण अपघात, लहान मुलगी देखील हॉस्पिटलमध्ये दाखल…

By Viraltm Team

Published on:

जुड़वा, घरवाली बाहरवाली, क्योंकि मैं झूठ नहीं बोलता सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री रंभासंबंधी एक वाईट बातमी समोर आली आहे. तिच्या कारहा भीषण अपघात झाला आहे. गाडीमध्ये तिच्यासोबत मुले आणि आया देखील होते. सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र तिची मुलगी साशा अजून हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. तिने चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.

हिंदी सोबत तेलगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, भोजपूर आणि इंग्लिश चित्रपटांमध्ये काम केलेल्या रंभाने सोशल मिडियाद्वारे याची माहिती दिली आहे. तिने इंस्टाग्रामवरून तिच्या मुलीचा एक फोटो शेयर केला आहे जी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे आणि डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहेत. दुसरा आणि तिसरा फोटो कारचा आहे, जी अपघातानंतर खराब झाली आहे.

या पोस्टवर प्रसिद्ध सेलेब्स आणि चाहते कमेंट करून रंभा आणि तिच्या मुलीसाठी प्रार्थना करत आहेत. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि शाळेमधून मुलांना घेतल्यानंतर आमच्या कारला दुसऱ्या कारने चौरस्त्यावर धडक मारली. मुलांसोबत मी आणि आया देखील होतो. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. माझी लहान साशा अजूनदेखील हॉस्पिटलमध्ये आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा.

रंभाचे खरे नाव विजयलक्ष्मी होते. तिने दोन दशकांमध्ये १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. ९० च्या दरम्यान रंभा बॉलीवूडच्या फेमस अभिनेत्रींपैकी एक होती. एके काळी तिने दिव्या भारतीला टक्कर दिली होती. २००० पर्यंत ती हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय होती. तिचा जन्म ५ जून १९७६ रोजी आंध्र प्रदेशमध्ये एका तेलगु कुटुंबामध्ये झाला होता. जेव्हा ती ७ वी मध्ये होती तेव्हा तिने शाळेमध्ये एनुअल डे कॉम्पिटीशनमध्ये भाग घेतला होता आणि तिने अम्मावरू संबंधी एक अॅक्ट केला होता. या इवेंटमध्ये दिग्दर्शक हरिहरन देखील होते जे रंभाच्या कॉन्टैक्टमध्ये राहिले आणि नंतर त्यांनी सरगम या मल्याळम चित्रपटामधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री करण्याची संधी दिली. तिचे पहिले ऑनस्क्रीन नाव अमृता होते, ज्यानंतर बदलून रंभा ठेवले गेले. हे नाव तिच्या तेलगु डेब्यू चित्रपटामधील भूमिकेचे होते.

रंभाने १५ व्या वर्षी शाळा सोडली होती. तिने साउथच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले. यानंतर १९९५ मध्ये हिंदी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. तिचा पहिला हिंदी चित्रपट जल्लाद होता. यानंतर ती जंग, कहर, जुड़वा, बंधन आणि जानी दुश्मन सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. तिचा शेवटचा चित्रपट २००४ मध्ये दुकान रिलीज झाला होता.

पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर रंभाने कॅनडास्थित श्रीलंकन उद्योगपती इंद्रकुमार पथमनाथन यांच्याशी ८ एप्रिल २०१० रोजी लग्न केले. यानंतर ती टोरंटोमध्ये स्थायिक झाली. तिला दोन मुली आणि एक मुलग आहे. लग्नानंतर रंभाने फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला. कारण तिला असे वाटले कि आता तिची लोकप्रियता कमी झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by RambhaIndrakumar💕 (@rambhaindran_)

Leave a Comment