सिनेजगतात असे बरेच स्टार्स आहेत ज्यांच्या मैत्रीचे दाखले अनेक वेळा दिले जातात. त्यामध्ये अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ ह्यांचे नाव सुद्धा येते. आणिक कपूर आणि जॅकी श्रॉफ ह्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे त्यामध्ये राम लखन, त्रिमूर्ती, युद्ध, अंदाज अपना, रूप किराणा चोरो का राजा आणि कभी ना कभी सारख्या चित्रपटांचा समावेश होतो. ह्या दोघांना फिल्म इंडस्ट्री मध्ये बरीच वर्ष झाली आहेत. काही दिवसांपूर्वीच निर्माता विधू विनोद चोप्रा ह्यांनी जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूरशी संबंधित ३० वर्ष जुना किस्सा सांगितला. आज अनिल कपूर च्या वाढदिवशी आम्ही तो किस्सा तुम्हाला सांगणार आहोत.
विधी विनोद चोप्रा ह्यांनी हा किस्सा सोशल मीडिया वर एक व्हिडीओ पोस्ट करून केला होता. ह्या व्हिडीओ मध्ये विधू व्यतिरिक्त अनुराग कश्यप, अनिल आणि जॅकी पण दिसत आहेत. व्हिडीओ मध्ये अनिल आणि जॅकी आपली फिल्म परिंदा बद्दल सांगत आहेत. हा विडिओ शेयर करताना विधी विनोद चोप्रा लिहितात, “अनिल कपूर नेहमी आपल्या कामाप्रती निष्ठावंत राहतात जेव्हा गोष्ट सर्वोत्तम शॉट ची असते. एका परफेक्ट शॉट साठी अनिल ने तेव्हा १७ रिटेक्स घेतले होते.ह्या व्हिडीओ मध्ये परिंदा चित्रपटाचा एक सीन दाखवला आहे. ह्या सीन मध्ये जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर ह्यांच्यात वाद सुरु असतो. ह्या वादा दरम्यान जॅकी अनिल ला एक जोरदार कानाखाली मारतो. ह्या सीन बद्दल जॅकी विडिओ मध्ये बोलत आहेत. जॅकी म्हणतात, “अनिल त्या दृश्यातल्या वेदनेला सीन मध्ये दाखवू इच्छित होता कि त्याच्या मोठ्या भावाने त्याच्या कानाखाली मारली आहे. जॅकी पुढे म्हणतो, “पहिला शॉट ठीक झाला होता, आणि चेहेर्याची भाव सुद्धा एकदम हवेतसे मिळाले होते. पण अनिल म्हणाला, नाही अजून एक. असे अजून एक करत करत १७ कानाखाली मी त्याला त्या सीन साठी मारल्या. ह्यामध्ये खास गोष्ट अशी आहे कि इथे खरी खुरी कानाखाली मारावी लागत होती कारण ह्याची रिअक्शन हवेत येत नाही”.
तुम्हाला सांगतो परिंदा फिल्म ३ नोव्हेंबर, १९८९ ला रिलीज झाली होती. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते विधू विनोद चोप्रा होते. परिंदा मध्ये जॅकी आणि अनिल व्यतिरिक्त नाना पाटेकर, माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर होते. ह्या फिल्म ने बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली होती. अनिल कपूर ह्यांना आज म्हणजे २४ डिसेम्बर ला ६३ वर्ष पूर्ण झाली. तर जॅकी श्रॉफ १ फेब्रुवारी ला ६३ वर्ष पूर्ण करतील. जॅकी श्रॉफ ह्यांनी आतापर्यंत २५६ चित्रपटांमध्ये काम केले असून अनिल कपूर ह्यांनी १३७ चित्रपटांमध्ये काम केले आहे.जॅकी श्रॉफ ह्यांचे खरे नाव जयकिशन श्रॉफ असुन त्यांचा १९५७ साली गुजराती कुटुंबात जन्म झाला होता. जॅकी श्रॉफ ह्यांना फिल्म इंडस्ट्री मध्ये जग्गा म्हणूनही हाक मारतात. त्यांची पहिली फिल्म देव आनंद स्टारर हिरा पन्ना होती, त्यामध्ये त्यांनी व्हिलन ची भूमिका केली होती. त्यांचा मुलगा टायगर श्रॉफ सुद्धा फिल्म इंडस्टी मध्ये अभिनयाच्या क्षेत्रात उतरला आहे. तर अनिल कपूर ह्यांचा जन्म सुद्धा मुंबईत चेंबूर च्या टिळक नगर चाळीत झाला असून तिथेच लहानाचे मोठे झाले आहेत. अनिल ह्यांची दोन्ही मुलं सोनम आणि हर्षवर्धन कपूर अभिनयात आपला ठसा उमटवत आहेत. तिसरी मुलगी रेहा कपूर निर्माती आहे. माहिती आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका आणि तुमची प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा.