सध्या व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. अशामध्ये अनेक हृद्य जोडली जाणार आहे. त्याचबरोबर काही हृद्य तुटणारदेखील आहेत. असो हा सर्व आयुष्याचा भाग आहे. यापासून निराश नाही झाले पाहिजे. सर्व काही विसरून पुढे जात राहिले पाहिजे. तसे तर व्हॅलेंटाईन वीकमध्ये अनेक लव स्टोरीज बनत असतात आणि त्या तितक्याच लवकर तुटतात देखील. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधी काही प्रसिद्ध लव स्टोरीज सांगणार आहोत ज्या फेमस तर खूपच होत्या परंतु पूर्ण होऊ शकल्या नाहीत.
अमिताभ बच्चन आणि रेखा :- जेव्हा कधी बॉलीवूडमधील लव स्टोरीजचे नाव समोर येते तेव्हा सर्वात पहिले अमिताभ बच्चन आणि रेखाचे नाव नक्कीच समोर येते. आज बराच काळ लोटला आहे परंतु आज सुद्धा यांच्या लव स्टोरीचे कोणतेना कोणते किस्से ऐकायला मिळतात. १९८१ मध्ये यश चोप्राने अमिताभ, रेखा आणि जया सोबत सिलसिला हा चित्रपट बनवला होता. तो शेवटचा चित्रपट होता ज्यामध्ये हे दोन कलाकार एकत्र दिसले होते, यानंतर त्यांचा कधीही एकत्र फोटोदेखील समोर आला नाही.अक्षय आणि शिल्पा शेट्टी :- त्या काळामध्ये अक्षय आणि शिल्पाचे चांगलेच प्रेमसंबंध होते. नेहमी ते एकत्र पाहिले जात होते, इतकेच नव्हे तर ते लवकरच लग्न करणार आहेत अशा बातम्या देखील समोर आल्या होत्या. परंतु यादरम्यान अक्षयचे ट्विंकल खन्नासोबत अफेयर असल्याच्या चर्चा समोर आल्या. त्यानंतरच अक्षय आणि शिल्पाचे नाते संपुष्टात आले. या गोष्टीचा खुलासा स्वतः ट्विंकलने केला आहे.
सलमान आणि ऐश्वर्या :- अमिताभ आणि रेखानंतर सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली ती सलमान आणि ऐश्वर्याच्या लव स्टोरीला. या दोघांची जोडी त्यांच्या फॅन्सची सुद्धा तितकीच आवडती जोडी होती. परंतु सलमानचा ओव्हर पजेसिव व्यवहार ऐश्वर्यासाठी खूपच बंधनकारक ठरू लागला आणि त्यांच्यामध्ये छोटे छोटे वाद होऊ लागले आणि या वादाचे रुपांतर ब्रेकअपमध्ये झाले.
अभिषेक आणि करिश्मा कपूर :- अभिषेकने स्वतः करिश्माला अंगठी देऊन प्रपोज केले होते. त्यांची तर एंगेजमेंटसुद्धा झाली होती, फिल्म इंडस्ट्रीमध्ये बच्चन आणि कपूर हे दोन मोठे परिवार एकत्र होणार होते. परंतु त्यांचे हे नाते अचानक तुटले. असे म्हंटले जाते कि यांच्या नात्याचे तुटण्याचे मुख्य कारण करिश्माची आई बबिता कपूर होती.
करीना आणि शाहिद :- करीना कपूर आणि शाहिद सर्वात प्रथम २००४ मध्ये फिदा या चित्रपटामध्ये एकत्र दिसले होते. यादरम्यान झालेल्या यांच्या मैत्रीने प्रेमामध्ये रुपांतर केले, यांची जोडी लोकांना खूपच पसंत पडली होती. परंतु अचानक यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. याचे कारणही समोर आले होते. यांच्या वेगळे होण्याने यांचे फॅन्सदेखील खूप दुखी झाले होते.