सन 1990 च्या दशकातील बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रविना टंडन. रविना टंडनने आपल्या अभिनयाने आणि अदाकारीने बॉलीवूड मध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमधील रविना टंडन चा हा प्रवास आपल्याला वाटतो तितका सोपा नव्हता. रवीना ने दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. रविना टंडन तिच्या भूमिका सोबतच सडेतोड भूमिका तसेच वक्तव्या साठी ओळखली जाते. विशेष करून रविना टंडन सामाजिक विषयावरही आपले मत मांडताना दिसत असते. नुकत्याच पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अभिनेत्यांसोबत इतर गोष्टीवर तिने मोठा खुलासा केला आहे.रविना सांगते की बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला होता. अनेक संकटाला सामोरे जावं लागलं होतं. बॉलीवूड मध्ये पूर्वी पत्रकार हिरो गर्लफ्रेंड यांचे ग्रुप असायचे. रविना सांगते की मला कमाल वाटते की ज्या महिला पत्रकार स्वतःला स्त्रीवादी म्हणून दिंडोरा पीठवून घेतात अशा पत्रकारांनी त्या वेळेस मला सपोर्ट केला नाही. कारण त्यावेळी त्या महिला पत्रकारांना हिरोनी त्यांच्या पत्रकाच्या कव्हर स्टोरी ला पहिल्या पानावर स्टोरी साठी आश्वासन दिलेले असायचे.रवीना सांगते की बॉलीवूड मध्ये मी उठवलेल्या प्रामाणिक आवाजामुळे नाहीतर पत्रकारांनी लिहिलेल्या चुकीच्या लिखाणामुळे मी अनेक चित्रपट गमावले. बॉलीवूड मध्ये मीच नाही तर अनेक हीरोइन कास्टिंग कोच ला बळी पडलेल्या आहेत. अनेकांनी त्याविरोधात मी टू हॅश टॅग देऊन स्वता वर झालेल्या अन्यायाविरोधात सोशल मीडिया वरती वाचा फोडलेली आहे.रवीना पुढे म्हणाले की बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये माझा कोणीही गॉडफादर नव्हता. बॉलिवूडमध्ये चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी कोणत्याही अभिनेत्यासोबत मी मर्यादा ओलांडल्या नाहीत. चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी माझे बॉलिवूडमध्ये कोणासोबतही अफेयर नव्हते. बॉलीवूड मध्ये अनेकदा अभिनेते माझ्या कडून अपेक्षा करत असत. परंतु त्यांनी केलेल्या अपेक्षा मी कधीही पूर्ण केल्या नाहीत. त्यांनी उठ म्हणले उठायचं आणि बस मध्ये बसायचं असं मी कधीच केलं नाही. त्यामुळे मला बॉलिवूडमध्ये गर्विष्ठ असा शेरा लागला होता. परंतु मी कोणाच्याही हातात खेळण न होता मी माझं आयुष्य माझ्या अटीवर जगले.मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.