बॉलीवूड अभिनेत्री रेखा दीर्घकाळापासून चित्रपटांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली नाही. तथापि ती एखाद्या पार्टी किंवा इवेंटमध्ये दिसते. रेखा अजूनही तिच्या घरामध्ये एकटीच राहते. पण तिचे कुटुंब खूप मोठे आहे आज आम्ही तुम्हाला रेखाच्या भाऊ आणि बहिणींबद्दल सांगणार आहोत. रेखाच्या बहिणींची नावे जया श्रीधर, रेवती स्वामीनाथन, कमला सेलवराज, राधा उस्मान सैयद, नारायणी गणेशन आणि विजया चामुंडेश्वरी अशी आहेत.

रेखाचे वडील जेमिनी गणेशन तमिळ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता राहिलेले आहेत. रेखाच्या वडिलांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून चार मुली आहेत तर दुसऱ्या पतीपासून दोन मुली आहेत. रेखाच्या वडिलांनी तिसरे लग्न केले आणि त्यांना तिसऱ्या पत्नीपासून एक मुलगा आणि एक मुलगी झाली. रेखा आणि जेमिनी गणेशन यांचे संबंध चांगले नव्हते. रेखा तिच्या वडिलांचा नेहमी तिरस्कार करत होती. परंतु त्यांचा त्यांच्या बहिणींशी खूप चांगला संबंध आहे.रेखाच्या सर्व बहिणी एकमेकांवर खूप प्रेम करतात. रेखाला आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी खूप लहान वयामध्ये काम करावे लागले होते. परंतु आज रेखाच्या बहिणीदेखील मागे नाहीत. त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी यशस्वी आहेत. रेखाची मोठी बहिण डॉ. रेवती स्वामीनाथन अमेरिकेतली एक सुप्रसिद्ध डॉक्टर आहे आणि दुसरी बहिण कमला सेल्वराज हि देखील डॉक्टर असून ती चेन्नई येथील रुग्णालयामध्ये असते.रेखाची तिसरी बहिण नारायणी गणेश एक जनर्लिस्ट आहे जी एका आघाडीच्या वर्तमानपत्रात काम करते. तर रेखाची स्वतःची बहिण राधाने साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. तथापि ती आता लग्न करून अमेरिकेमध्ये स्थायिक झाली आहे. रेखाचे कदाचित तिच्या वडिलांशी चांगले संबंध नव्हते परंतु रेखाचे तिच्या भावंडांशी खूप चांगले संबंध आहेत.