चित्रपट बागी २ च्या यशानंतर दिशा पटानीचे नाव बड्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये घेतले जाते. दिशा पटानीने भले हि कमी चित्रपटांमध्ये केले असले तरी तिचे नाव प्रत्येक सिने-प्रेमींच्या तोंडात आहे. सुंदरतेबद्दल बोलायचे झाले तर दिशा फक्त सुंदरच नाही तर तिच्या चेहऱ्यावर लहान मुलांच्यासारखा निरागसपणा दिसून येतो. आपण एकदाच तिला पाहून असे म्हणू म्हणू शकतो ती दिशा पटानीसारखी अभिनेत्री अख्या सिनेजगतामध्ये नसेल.
तथापि, असे नाही. दिशा पटानीपेक्षा सुंदर मुलगी शोधण्यासाठी इतरत्र जाण्याची काही गरज नाही कारण दिशाची बहिणच सौंदर्याच्या बाबतीत दिशाला टक्कर देते. दिशा पटानीच्या परिवाराबद्दल बोलायचे झाले तर ते बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीपासून नेहमीच दूर असतात. दिशाच्या वडिलांची नाव जगदीश सिंह पटानी असे आहे.
दिशाला एक मोठी बहिण असून तिचे नाव खुशबू असे आहे तर तिला एक लहान भाऊ आहे त्याचे नाव आहे सूर्यान्श. खुशबू पटानी भारतीय सेनेमध्ये अधिकारी आहे. दिशाच्या संपूर्ण कुटुंबाचा संबंध उत्तराखंडच्या टनकपूर ठिकाणाशी आहे. असे म्हंटले जाते कि दिशा जिथे खूपच चूलबुली आहे तिथे खुशबू खूपच शांत स्वभावाची आहे. खुशबू चा जन्म २३ नोव्हेंबर १९९१ रोजी झाला होता आता ती २५ वर्षांची आह. खुशबू हि इंजिनिअर असून तिने डीआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग ग्रेटर नॉयडा येथून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे. सध्या ती अविवाहित असून तिला डान्सिंगची खूप आवड आहे.