६१ वर्षांची झाली कॉमेडी क्वीन गुड्डी मारुति जाणून घ्या आता काय करते !

By Viraltm Team

Published on:

गुड्डी मारुती एक असे व्यक्तिमत्व आहे जिला आजची पिढी भले हि ओळखत नसेल पण ९० च्या दशकातील चित्रपटांमध्ये गुड्डीची कॉमेडी खूपच लोकप्रिय झाली होती. पुरुषांमध्ये जॉनी लीव्हर हा त्याकाळी कॉमेडीमध्ये वर्चस्व गाजवत होता तर गुड्डी कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जात होती, जी आपल्या कॉमेडीने लोकांना हसण्यास भाग पाडत होती.

अभिनय कौशल्य आणि आपल्या कॉमेडी टाइमिंगने गुड्डीने दर्शकांची मने जिंकली. आज गुड्डी मारुती ६१ वर्षांची झाली आहे. ४ एप्रिल १९५९ रोजी गुड्डीचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. गुड्डीचे वडील मारुतीराव परबसुद्धा एक कॉमेडी अभिनेता आणि दिग्दर्शक होते. गुड्डी मारुतीचे खरे नाव ताहीर परब आहे तर गुड्डी हे तिचे टोपणनाव आहे. प्रसिद्ध फिल्म निर्माता मनमोहन देसाईने ताहिराला ऑनस्क्रीन गुड्डी हे नाव दिले होते.गुड्डी मारुतीच्या करियरची सुरवात अवघ्या १० व्या वर्षीच झाली होती. जान हाज़िर हैं या चित्रपटामध्ये गुड्डी एक बालकलाकार म्हणून दिसली होती ज्यानंतर तिने १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. विशेष म्हणजे गुड्डी इतकी जाड असून देखील तिची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही. इतकेच नव्हते तर तिची उंची आणि जाडीमुळे तिला चित्रपटांमध्ये टुनटुन हि ओळख मिळाली. दूल्हे राजा, बीवी नंबर वन, बरसात की एक रात, खिलाड़ी, शोला और शबनम आणि आशिक अवारा सारख्या चित्रपटांमध्ये गुड्डीने दर्शकांना खूपच हसवले.चित्रपटांशिवाय गुड्डीने छोट्या पडद्यावर देखील काम केले आणि तिथे देखील तिने आपली ओळख निर्माण केली. १९८५ मध्ये गुड्डी पहिल्यांदा इधर उधर या सिरीयलमध्ये पाहायला मिळाली होती. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या सिरीयल मध्ये गुड्डीने मोटी शबनमची भूमिका साकारली होती. ज्यानंतर तिने मिसेज़ कौशिक की पांच बहुंए आणि डोली अरमानों सारख्या सिरीयल मध्ये देखील काम केले. यानंतर गुड्डीने अभिनयापासून मोठा ब्रेक घेतला आणि नंतर तिने २०१८ मध्ये पुनरागमन केले.सोनी टीव्हीवरील प्रसारित झालेल्या ये उन दिनों की बात है या सिरीयलमध्ये गुड्डी मारुतीने कॉलेज़ प्रीसिंपलची भूमिका साकारली होती. सिरीयलमध्ये तिच्या भूमिकेला खूपच पसंत केले गेले.

Leave a Comment