मागील वर्षी २६ डिसेंबर २०१९ रोजी सूर्यग्रहण झाले होते आणि हे वर्षाचे शेवटचे ग्रहण होते. आता २०२० चे ग्रहणसुद्धा लवकरच होणार आहे आणि हे ग्रहण चंद्रग्रहण असणार आहे. नुकतेच झालेल्या सूर्यग्रहणासंदर्भात संपूर्ण भारतामध्ये चांगलाच उत्साह होता. अनेक लोकांनी हे सूर्यग्रहण पाहून त्याचा आनंद घेतला. केवळ सामान्य लोकांनीच नाही तर देशाच्या पंतप्रधानांनीही सूर्यग्रहणाबद्दलचा फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंट वरून शेयर केला आणि आता २०२० चे चंद्रहणदेखील लवकरच येणार आहे. या वर्षी होणारे पहिले चंद्रग्रहण हे येत्या १० जानेवारीला होणार आहे. यावेळी हे चंद्रग्रहण युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अनेक आशियातील देशांमधून पाहता येणार आहे.

चंद्रग्रहणाची वेळ :- १० जानेवारी रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाची वेळ हि रात्री १०.१७ ते ११ जानेवारीच्या रात्री २.४२ पर्यंत राहील. यामध्ये चंद्रग्रहणाचा काळ हा चार तास राहणार आहे.या ग्रहणाला आहे धार्मिक महत्व :- पौर्णिमेला होणार्‍या या चंद्रग्रहणाला खूप धार्मिक महत्व आहे. यावेळी १० जानेवारीला पौष पौर्णिमा आहे. ज्याला त्याचे एक विशेष महत्व देखील आहे. या दिवशी गुरूची पूजा केली जाते आणि पवीत्र नदीमध्ये स्नान केले जाते.

१० जानेवारी रोजी पौष पौर्णिमेला प्रयागराज येथे माघ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मान्यतेनुसार पौष पौर्णिमेला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो. माघ महिन्याच्या सुरवातीमुळे देखील याला शुभ मानले जाते. असे म्हंटले जाते कि, चंद्रग्रहणावेळी कोणत्याही तलावामध्ये स्नान केल्यास संपूर्ण पापांपासून मुक्ति मिळते.तथापि यावेळी हे स्नान चंद्रग्रहणानंतरच करावे लागणार आहे, कारण चंद्रग्रहणापूच्या १२ तास अगोदर सुतक काळ सुरु होणार आहे. ज्यामुळे सर्व मंदिरे बंद केली जाणार आहेत. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो कि, यावर्षी एकूण पाच ग्रहण होणार आहेत, ज्यामध्ये तीन चंद्र ग्रहण असतील तर दोन सूर्यग्रहण असणार आहेत.