८० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री ‘रीना रॉय’ आठवते का ? आज झालेय असे हाल की ओळखणे देखील आहे कठीण !

By Viraltm Team

Published on:

इंडियन आइडल १२ या रियालिटी शोमध्ये लवकरच आपल्याला जुन्या काळामधील प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय स्पेशल गेस्ट म्हणून पाहायला मिळणार आहे. हा एपिसोड रीना रॉयच्या चित्रपटांमधील गाण्यांवरच आधारित बनवण्यात आला आहे.

रीना रॉय कंटेस्टेंटच्या परफॉर्मेंसवर लीप सिंक करताना पाहायला मिळणार आहे. ६४ वर्षांची रीना रॉय रिफ्यूजी चित्रपटामध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. तसे रीना रॉयचा लुक आता खूपच बदलला आहे. इतकेच नाही तर तिला ओळखणे देखील खूप कठीण झाले आहे.

एक वेळ अशी आली होती कि तिचे वजन खूपच वाढले होते. माहितीनुसार आपले वजन कमी करण्यासाठी अभिनेत्रीने बेरियाट्रिक सर्जरी देखील करून घेतली होती. या सर्जरीच्या मदतीने तिने आपले तब्बल २५ किलो वजन कमी केले होते.

बेरियाट्रिक सर्जरी अशा जाड व्यक्तीची केली जाते ज्यांचे प्रमाणापेक्षा खूपच जास्त वजन वाढलेले असते. अशा लोकांसाठी हि सर्जरी वजन कमी करण्याचे काम करते. यामध्ये पोट आणि आतड्यांचे ऑपरेशन केले जाते आणि अतिरिक्त चरबी बाहेर काढली जाते. रीना रॉयची बहिण बरखानुसार डॉ. लकड़ावालाच्या सल्ल्यावरून तिने हि सर्जरी करून घेतली होती.

रीना रॉयने १९७२ मध्ये जरुरत या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. आपल्या पहिल्याच चित्रपटामध्ये तिला सेमी न्यू ड आणि इं टी’मेट सीन्स द्यावे लागले होते. वास्तविक रीना इंडस्ट्रीमध्ये कोणाला ओळखत नव्हती आणि कामाच्या शोधामध्ये ती भटकत होती. अशामध्ये तिला बीआर इशाराच्या जरुरत चित्रपटाची ऑफर मिळाली. तथापि हा चित्रपट फ्लॉप झाला होता.

यानंतर १९७६ मध्ये रीना रॉयने जितेंद्रसोबत नागीण आणि शत्रुघ्न सिन्हासोबत कालीचरण चित्रपटामध्ये काम केले. दोन्हीही चित्रपट सुपरहिट झाले होते आणि अशाप्रकारे रीना रॉयला फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवीन ओळख मिळाली.

अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर रीना रॉयने १९८३ मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसोबत लग्न केले. तथापि मोहसीन आणि रीनाचे हे नाते फार काळ टिकले नाही आणि ७ वर्षांनंतर १९९० मध्ये ते घटस्फोट घेऊन वेगळे झाले. मोहसिन खानपासून रीनाला एक मुलगी देखील आहे जिचे नाव सनम आहे.

सुरुवातीमध्ये संनमची कस्टडी तिचे वडील मोहसिनला मिळाली पण जेव्हा मोहसीनने दुसरे लग्न केले तेव्हा रीना रॉयला सनमची कस्टडी मिळाली. आता ती मुलीसोबत मुंबईमध्ये राहते. रीना जेव्हा आपल्या करियरच्या पीकवर होती तेव्हा तिचे नाव चित्रपटांपेक्षा शत्रुघ्न सिन्हाच्या अफेयरमुळे खूप चर्चेमध्ये राहिले. यामुळे लोक शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षी सिन्हाची तुलना रीना रॉयसोबत करतात. रीनासोबत तुलना केल्यानंतर सोनाक्षी एकदा खूपच भडकली होती.

वास्तविक जेव्हा सोनाक्षीने दबंग चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता तेव्हा त्यावेळी लोकांनी तिच्या चेहऱ्याची तुलना रीना रॉयसोबत करायला सुरुवात कली होती. यामुळे सोनाक्षी फक्त नाराजच झाली नव्हती तर तिची आई पूनम तर मिडियावर चांगलीच भडकली होती.

माहितीनुसार सोनाक्षीला पाहून लोक तिला रीनाचीच मुलगी समजत होते. याचे मोठे कारण हे होते कि शत्रुघ्न सिन्हा लग्न झाल्यानंतर देखील रीना रॉयला डेट करत होते आणि लोकांचे म्हणणे आहे कि सोनाक्षी या दोघांचीच मुलगी आहे. जिला नंतर शत्रुघ्नची पत्नी पूनमकडे सोपवण्यात आले होते. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आजदेखील याची चर्चा होते.
जेव्हा रीना रॉयच्या कानावर हि गोष्ट पडली तेव्हा तिने एक प्रेम कॉन्फ्रेंस घेऊन या गोष्टीचे खंडन केले होते. मुलाखतीदरम्यान रीना म्हणाली होती कि सोनाक्षीचा चेहरा तिची आई पूनम सिन्हासारखा दिसतो. याशिवाय रीना रॉयने हे देखील म्हंटले होते कि दबंगमध्ये सोनाक्षीला सलमान खानने एक खास इंडियन लुक दिला होता आणि सोनाक्षीचा चेहरा मिलता जुळता असल्याचे हे देखील कारण होऊ शकते.
रीनाने १९९२ मध्ये आदमी खिलौना है या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले होते. पण तिचा हा चित्रपट काही खास कमाल दाखवू शकला नाही. नंतर रीना चित्रपटांपासून दूर गेली. रीना रॉयने नागिन (१९७६), जानी-दुश्मन (१९७९), आशा (१९८०), नसीब (१९८०), बदले की आग (१९८२), प्यासा सावन (१९८२), हथकड़ी (१९८२) सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Leave a Comment