‘हा’ अभिनेता मधी आला नसता तर साउथच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्याची बायको म्हणून मिरवत असती तब्बू…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री तब्बूचा आज वाढदिवस आहे. ४ नोव्हेंबर १९७१ रोजी तबस्सुम फातिमा हाशमी उर्फ तब्बूचा हैदराबादमध्ये जन्म झाला होता. तब्बू एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहे, यामागे एक कारण देखील आहे. वास्तविक ती एका फिल्मी बॅकग्राउंडमधून आहे.

तब्बूने चाईल्ड आर्टिस्ट म्हणून हम नौजवां चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. अजय देवगन आणि तब्बू एकत्र लहानाचे मोठे झाले, नंतर तब्बूने जेव्हा बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली तेव्हा तिचा हिरो अजय देवगनच होता आणि हा चित्रपट होता विजयपथ. एकदा तब्बूने खुलासा केला ह्तों कि ती अजय देवगनमुळे अजूनदेखील लग्न करू शकली नाही.

बॉलीवूडमधील सुदर अभिनेत्री तब्बू दीर्घ काळ बॉलीवूडमध्ये सक्रीय आहे पण ५१ व्या वर्षी देखील ती अजून अविवाहित आहे. तब्बूने एकदा याबद्दल खुलासा केला होता कि अजय देवगनमुळे ती लग्न करू शकली नाही, आज देखील ती अजय देवनमुळे सिंगल आहे.

तब्बूने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता कि ती आणि अजय देवगन २६ वर्षापासून मित्र आहेत. अजय आणि तब्बूचा कजीन समीर आर्या जवळ जवळ राहतात. यामुळे दोघांची चांगली मैत्री झाली होती. तब्बूने एकदा याचा खुलासा करत म्हंटले होते कि तिचा कजीन समीर आर्य आणि अजय तिच्यावर नेहमी लक्ष ठेवायचे. कोणताही मुलगा तब्बूच्या आसपास दिसायचा तेव्हा ते त्याची धुलाई करायचे.

या दोघांमुळे तब्बू कोणालाही आपलेसे बनवू शकली नाही, तब्बूने स्पष्ट केले होते कि जर आज मी सिंगल आहे तर त्याचे मुख्य कारण फक्त अजय देवगन आहे. तब्बूचे अफेयर साउथचा दिग्गज अभिनेता नागार्जुनसोबत देखील राहिले आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील होऊ लागल्या होत्या. तर अभिनेता नागार्जुन पुन्हा आपल्या पत्नीकडे परत केला. वास्तविक नागार्जुन आधीच विवाहित होता, त्याला त्याच्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता यामुळे तब्बू आणि नागार्जुन वेगळे झाले.

Leave a Comment