बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेता आहेत ज्यांनी चित्रपटामध्ये फौजीची भूमिका साकारली आहे त्याचबरोबर काही अभिनेत्यांनी आर्मीमध्ये राहून देशाची सेवादेखील केली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी आर्मी जॉईन करणार होती आणि ती आहे अभिनेत्री कंगना शर्मा. अभिनेत्री कंगना शर्मालासुद्धा आर्मीमध्ये भर्ती व्हायचे होते परंतु ती आज अभिनेत्री बनून करोडो लोकांच्या मनावर राज्य करीत आहे.
कंगना शर्माचा जन्म हरियाणाच्या एका सामान्य कुटुंबामध्ये झाला होता. शाळेमध्ये शिकत असतानाच तिने आर्मीमध्ये भर्ती होण्याचा निर्णय घेतला होता. तिने एनसीसीचा कोर्सदेखील पूर्ण केला होता. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने २०१४ मध्ये एक सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि ती जिंकली, ज्याची तिला अपेक्षा नव्हती. त्यानंतर तिला वाटले कि ती ग्लॅमरच्या दुनियेसाठी बनली आहे आणि अशाप्रकारे तिचा प्रवास सुरु झाला.तिने प्रसिद्ध डिझाइनर्ससाठी रॅम्प वॉक केले आणि त्यानंतर तिला इंद्र कुमारच्या ‘द ग्रेट ग्रँडमस्ती’ चित्रपटामध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिने अनेक जाहीरातींसाठी देखील काम केले आहे. अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये तिने अभिनय केला आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा म्युझिक व्हिडिओ निंद्रा फीवर रिलीज झाला होता, ज्यामध्ये तिच्या अनेक अदा पाहायला मिळाल्या होत्या.
चित्रपटांच्या दुनियेमध्ये कंगना काही खास कमाल दाखवू शकली नाही परंतु तीने बॉलीवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. तिचा प्रयत्न चालूच आहे. तिने टीव्हीवरहि काम केले आहे. या बॉलीवूड अभिनेत्रीने तू सूरज मैं सांझ पिया जी या सिरीयल साठी काम केले आहे.कंगना नेहमी फोटोशूट करत असते जे सोशल मिडियावर शेयर करून चर्चेमध्ये राहत असते. तिचे नाव टॉप मॉडेल्समध्ये घेतले जाते. सोशल मिडियावर तिचे करोडो फॅन फॉलोइंग आहेत. कंगना नेहमी तिच्या बोल्ड लुकमध्ये चर्चेमध्ये राहत असते. ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत आपले हॉट फोटो शेयर करत असते. तिचे चाहतेदेखील तिच्या फोटोंची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. तिचे हे फोटो सोशल मिडिया वर तुफान व्हायरल होत असतात.