भारतीय चित्रपटसृष्टीतली सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट बाहुबली आपण सर्वांनी नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा खूपच उत्कृष्ठ आहे. या सर्व व्यक्तिरेखा जगामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. या चित्रपटातील एक प्रसिद्ध भूमिका आहे ती म्हणजे कटप्पा. ज्याला लहान मुल देखील ओळखतात. हि व्यक्तिरेखा बाहुबलीच्या दोन्ही भागातील महत्वपूर्ण भूमिका आहे. हि प्रसिद्ध भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव सत्यराज असे आहे. त्यांनी याआधीही अनेक चित्रपटांमध्ये विशेष भूमिका साकारल्या आहेत. आज या लेखामधून आम्ही तुम्हाला त्यांच्या खऱ्या मुलीबद्दल माहिती देणार आहोत जी एखाद्या अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही.अभिनेता सत्यराजच्या मुलीचे नाव दिव्या सुबैय्या असे आहे. दिव्या दिसायला खूपच सुंदर आहे. तिचे सौंदर्य एखाद्या अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही, तरीही ती फिल्म इंडस्ट्रीपासून नेहमी दूरच असते. तिला चित्रपटांमध्ये काहीच रस नाही. परंतु तिने एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.
दिव्या सध्या २७ वर्षांची आहे. तिला एक भाऊ देखील आहे आणि त्याचे नाव आहे सिबिराज. तर तिच्या आईचे नाव आहे महेश्वरी सुबैय्या. दिव्या पेशाने एक न्यूट्रिशनिस्ट असून तिला हे काम खूपच आवडते. तीला फिल्मी दुनियेच्या प्रकाशझोतापासून दूर राहनेच जास्त आवडते. हे कारण आहे ज्यामुळे तिला खूपच कमी लोक ओळखतात. सोशल मीडियावरसुद्धा दिव्या जास्त अॅक्टिव्ह नसते. अभिनेता सत्यराजचा मुलगा आणि दिव्याचा मोठा भाऊ सिबिराजसुद्धा एक अभिनेता आहे. त्याने अनेक साउथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा जन्म ६ ऑक्टोबर १९८२ मध्ये चेन्नई येथे झाला होता. सध्या तो ३७ वर्षांचा आहे.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.