टीव्ही अभिनेत्री आशका गोराडिया नेहमी आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेमध्ये राहत असते. तिचे फोटो काही मिनिटांमध्येच व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी अशकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून योगा करतानाचा फोटो शेयर केला होता.
हा फोटो शेयर केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. काहीच तासांमध्ये या फोटोला जवळ जवळ ६००० पेक्षा जास्त लाईक मिळाले होते. फोटोमध्ये अशका योगा करताना दिसत आहे. चाहत्यांना अशकाचा हा योगा खूपच आवडला आहे. अभिनेत्रीचा हा फोटो पाहिल्यानंतर असे दिसत आहे कि ती योगा खूप एन्जॉय करत आहे.
अशकाने सोशल मिडियावर फोटो शेयर केल्यानंतर काही तासांमध्ये तो चांगलाच व्हायरल झाला. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर भरभरून कमेंट करून तिचे कौतुक केले आहे. अशकाने आपल्या करियरची सुरुवात २००२ मध्ये अचानक ३७ साल बाद या सिरीयलमधून केली होती.
याशिवाय अशका कुसुम, गेट सेट गो, सिंदूर तेरे नाम का, विरुद्ध आणि नागीण सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. अशकाला बिगबॉस ६, खतरो के खिलाडी आणि नच बलियेचा देखील भाग राहिली आहे. अशकाने दोन वर्षांपूर्वी डिसेंबरमध्ये लग्न केले होते.
अशकाचा पती हा सर्टिफाईड योगा ट्रेनर आहे आणि अशका आपल्या पतीसोबत देखील योगा करत असते. टीव्ही अभिनेत्री अशका गोराडिया सध्या इंडस्ट्रीपासून दूर आहे. बऱ्याच दिवसांपासून ती सिरियल्स आणि इतर प्रोजेक्ट्समध्ये पाहायला मिळाली नाही.
View this post on Instagram
अभिनेत्री सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहते आणि ती नेहमी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडिया वर संपर्कात राहण्यासाठी आपले फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते. आशंका सध्या आपल्या बिजनेस ट्रीपवर फोकस करत आहे. तिचा स्वतःचा कॉस्मेटिक ब्रँड आहे आणि पतीसोबत गोव्यामध्ये एक योगा स्कूल देखील चालवते.