मराठी अभिनेता अक्षय वाघमारे आणि अरुण गवळी ह्यांची कन्या योगिता गवळी ह्यांचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला. अक्षय वाघमारे ह्याने २०१८ मध्ये आलेल्या दोस्तीगिरी ह्या मराठी चित्रपटामध्ये मुख्य भूमिका केली आहे तसेच बेधडक आणि बस स्टॉप ह्या मराठी चित्रपटांमध्येही तो झळकला होता. तसेच अक्षय २०१२ च्या पुणे टाइम्स फ्रेश फेस चा रनर अप सुद्धा राहिला आहे. एका हॉटेल मध्ये पार पडलेल्या ह्या समारंभात दोघांच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांची उपस्थिती पाहायला मिळाली. तसेच अभिनेता क्षितिज दाते, मुग्धा परांजपे, विभावरी देशपांडे आणि हृषीकेश देशपांडे ह्यांनीही साखरपुड्याला हजेरी लावली होती.

योगिता एक एन जी ओ चालवत असून ह्या एन जी ओ मार्फत ती महिलांच्या आरोग्यासाठी काम करते. योगिता आणि अक्षय एकमेकांना गेल्या पाच वर्षांपासून ओळखतात. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता, दोघांनी तो सल्ला मानत त्यांनी साखरपुडा केला. पुणे टाइम्स शी बोलताना अक्षय म्हणाला, मी योगिताला पाच वर्षांपासून ओळखतो, त्यामुळे आमच्या कुटुंबीयांनी आम्हाला लग्न करण्याचा सल्ला दिला आणि आम्ही दोघांनी तो सल्ला मानला आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही ह्या निर्णयाने खूप आनंदी आहोत. मी ह्या लग्नाला अरेंज मॅरेज म्हणण्यापेक्षा अरेंज्ड लव्ह मॅच असं म्हणेन.

दोघांनी पुढच्यावर्षी फेब्रुवारी मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षयने हल्लीच आलेल्या फत्तेशिकस्त चित्रपटामध्ये सरदार कोयाजी नाईक बांदल ह्यांची भूमिका साकारली होती. योगिता करा फाउंडेशन नावाचा एन जी ओ चालवत असून तीने पोलिटिकल सायन्स ह्या विषयात मास्टर्स केले आहे. माहिती आवडली असल्यास लाईक करून तुमची प्रतिक्रिया कमेंट करून कळवा.