बॉलीवूडमध्ये अनेक लव्ह स्टोरीज सुरु झाल्या आणि संपल्या, अशामध्ये आम्ही तुम्हाला एक लव्ह स्टोरी सांगणार आहोत जी एक प्रसिद्ध अभिनेत्री तर राहिली आहेच त्याचबरोबर एक मॉडेल आणि फॅशन डिझायनरसुद्धा राहिली आहे. या अभिनेत्री नाव आहे अंजू महेंद्रू. अंजू ११ जानेवारीला आपला वाढदिवस साजरा करते.
अंजूने १३ व्या वर्षामध्ये मॉडेलिंगला करायला सुरवात केली होती, इतकेच नाही तर १९६६ मध्ये उसकी कहानी या चित्रपटामधून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ज्वेल थीफ, बंधन आणि दस्तक सारख्या चित्रपटांमध्ये सुद्धा दिसली होती. अंजूला चित्रपटांमध्ये कधीच मुख्य भूमिका मिळाली नाही पण आता ती टीव्ही जगतामध्ये सक्रीय आहे.जेव्हा ती फिल्मी जगतामध्ये होती त्यादरम्यान अंजू, राजेश खन्नासोबतच्या आपल्या नात्यामुळे खूपच चर्चेमध्ये राहिली होती. तसे तर फिल्मी जगतामध्ये यश न मिळाल्यामुळे राजेश खन्नासोबतचे तिचे नाते फिल्मी कॉरिडॉरमध्ये नेहमीच चर्चेमध्ये राहिले. असे म्हंटले जाते कि दोघे ६ वर्षे लिव इनमध्ये राहिले आणि लग्न करणार होते.
फिल्मी इंडस्ट्रीमध्ये राजेश खन्ना जेव्हा स्ट्रगल करत होते तेव्हा अंजु महेंद्रू त्यांच्यासोबत होती. असे म्हंटले जाते कि लिव इन मध्ये राहण्यापूर्वी दोघांनी एंगेजमेंट केली होती. अंजूसोबत त्यांची भेट करियरच्या सुरवातीच्या काळामध्ये झाली होती. इतकेच नाही तर फॅशन डिझायनर अंजूने शोबिज साठी राजेश खानाचे ग्रुमिंग केले होते.अंजू महेन्द्रूने राजेश खन्नासोबत बंधन चित्रपटामध्ये सुद्धा काम केले आहे, असे म्हंटले जाते कि राजेश खन्नाची इच्छा नव्हती कि अंजूने चित्रपटांमध्ये काम करावे. जसे जसे राजेश खन्नाचा स्टारडम वाढत गेला तसे तसे अंजूसोबत त्यांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण होत गेले.
पण स्टोरीमध्ये ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा राजेश खन्नाने अंजूला सोडून डिंपल कपाडियासोबत लग्न केले. अंजूसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. त्यावेळच्या मिडियाने अंजू महेन्द्रुला हे म्हणताना छापले कि राजेश खन्नाने त्यांना धोका दिला. यामुळे तिला खूपच दुख पोहोचले. पण राजेश खन्ना आणि अंजू महेन्द्रुचे नाते आता पहिल्यासारखे नाही राहिले होते. इतकेच नाही तर दोघांच्या जवळच्या मित्रांना माहिती होते पण त्यांचा हा अंदाज सुद्धा नव्हता कि हे प्रकरण ब्रेकअप पर्यंत पोहोचेल.