बॉलीवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्यांच्या अॅलक्टिंगचे चर्चे देशातच नाही तर विदेशामध्ये सुद्धा झाले. या अभिनेत्रींनी आपल्या कामासोबत कधीही तडजोड केली नाही. मग कितीही अडचणींना तोंड द्यावे लागले तरीही. बॉलीवूडच्या काही अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रेग्नंसीच्या दरम्यान सुद्धा चित्रपटांचे शुटींग केले.

प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाने १९९५ मध्ये जय मेहतासोबत लग्न केले होते. परंतु नंतर सुद्धा तिने चित्रपटांमध्ये काम करणे सोडले नाही. जुही चावला जेव्हा पहिल्यांदा प्रेग्नंट झाली होती तेव्हा तिला अमेरिकामधून एक स्टेज शोची ऑफर मिळाली होती जी जुही चावलाने स्वीकार केली. झंकार बीट्स चित्रपटाच्या दरम्यानसुद्धा जुही प्रेग्नंट होती.माधुरी दीक्षितने १९९९ मध्ये डॉक्टर श्रीराम नेनेसोबत लग्न केले. लग्नानंतर बरीच वर्षे ती लंडनमध्ये राहिली. देवदास चित्रपटाच्या शुटींगदरम्यान मधुरी प्रेग्नंट होती आणि तिने चित्रपटाच्या मार डाला या गाण्यावर उत्कृष्ठ डान्स केला होता.जया बच्चन आणि अमिताभ बच्चनचे लग्न शोले चित्रपटाच्या अगोदर झाले होते. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान जया बच्चन प्रेग्नंट होती.
श्रीदेवी जेव्हा जुदाई चित्रपटाची शुटींग करत होती तेव्हा ती प्रेग्नंट होती. श्रीदेवीचे लग्न १९९६ मध्ये झाले होते आणि १९९७ मध्ये जान्हवी कपूरचा जन्म झाला होता.